कोकण

वाहतुकीला अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

CD

वाहतुकीला अडथळा
प्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरीः शहरातील सार्वजिनक रस्त्यावर वाहतूक अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या तीन संशयित चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद दत्ताराम शेलार (वय ४५, रा. आजगे, तेलीवाडी, ता. लांजा), शशांक पर्शुराम वोलांबे (वय ३८, रा. गाडीतळ, रत्नागिरी), सुलेमान अश्फाक सोलकर (वय ४५, रा. कातळी. ता. राजापूर, रत्नागिरी) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना सोमवारी व मंगळवारी (ता. १५) सकाळी साडेदहा ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास धनजीनाका ते मच्छीमार्केट, कुवारबाव पोलिस चौकी या सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आल्या.
......
भाटये समुद्र किनारी
अनोळखी महिला
रत्नागिरी ः शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी पाण्यात बुडून बेशुद्ध अवस्थेत असलेली अनोळखी महिला आढळली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी (ता. १६) दुपारी दीडच्या सुमारास भाटये समुद्र किनारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाटये समुद्रकिनारी आढळलेल्या ही अनोळखी महिला स्थानिकांना बेशुद्ध अवस्थेत दिसली. स्थानिक तहा काद्री, माजी सरपंच पराग भाटकर यांनी या बाबत शहर पोलिसात खबर दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून पहाणी केली. अनोळखी महिलेला तहा काद्री यांच्या गाडीतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या महिलेचे नाव गाव समजून येत नाही तिचे वय अंदाजे ५५ आहे. शहर पोलिस या महिलेचे नाव गावाचा शोध घेत आहेत.
----------
ट्रक-टेम्पो अपघात;
एकाचा मृत्यू
रत्नागिरीः तरवळ-घवाळीवाडी स्टॉपच्या अलीकडे नरबे फाटा रस्त्यावर ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले आहे. त्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिसात याबाबत नोंद केली आहे. मुजकिर अमजत जांभारकर (वय २५, रा. पडवे, ता. गुहागर ) असे मृत तरुणाचे व आहे. ही घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास नरबेफाटा येथे घडली होती. टेम्पो (एमएच-०८-डब्ल्यू-४७०३) मधून महिला फिरदोस न्यायत खळे, अमजत जांभारकर आणि मृत मुजकिर जांभारकर असे मंगळवारी पहाटे साडेचार वाजता जाकादेवी ते मिरकरवाडा असे जात असताना नरबे फाटा रस्त्यावर ट्रकने (एमएच-०९-जीजे-४३४७) टेम्पोला जोरदार धडक दिली होती. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते. ----------------
आंजर्ले, केळशीकिनारी
सापडले दोन मृतदेह
दापोली : तालुक्यातील आंजर्ले व केळशी समुद्रकिनारी दोन अज्ञात पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आंजर्ले येथील गणपती विसर्जन पॉईंटवर सुमारे ५० वर्षे वयाच्या, टी-शर्ट घातलेल्या व अर्धनग्न स्थितीतील पुरुषाचा मृतदेह आढळला. केळशी येथील बापू आळी पाठीमागील समुद्रकिनारी अशाच प्रकारे सुमारे ५० वर्षीय दुसऱ्या पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. दोनही मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र ते मच्छीमार व्यावसायिक असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ओळख पटवण्याचे तसेच मृत्यूचे नेमके कारण समजून घेण्यासाठी दापोली पोलिस तपास करीत आहेत. शवविच्छेदन करण्यासाठी दोन्ही मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. दोन्ही मृतदेहांची चौकशी व पंचनामा करून पुढील तपास सुरू असल्याचे दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरस्कर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Latest Marathi News Updates : राज ठाकरेंचा उद्या मीरा रोड दौरा

SCROLL FOR NEXT