कोकण

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांची पिळवणूक

CD

- rat१७p१.jpg-
२५N७८०६७
चिपळूण ः तहसीलदारांना निवेदन देताना जनता दल सेक्युलरच्या पदाधिकाऱ्यांसह महिला.

‘फायनान्स’कडून जादा व्याजदराने वसुली
जनता दल सेक्युलर; महिलांची पिळवणूक, कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः जिल्ह्यात खासगी सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी धुमाकूळ घातला असून, अव्वाच्यासव्वा दराने कर्जाची वसुली केली जात आहे. यामध्ये महिलांची पिळवणूक होत असल्यामुळे संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या व संबधित खासगी सावकारांवर कारवाई करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कर्जवसुली करताना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दलचे निवेदन तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांना देण्यात आले. फायनान्स कंपन्यांनी नियमबाह्य कर्जवाटप करून आर्थिक साक्षर नसलेल्या महिलांना कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहे. आधीचे कर्ज फेडण्यासाठी दुसरे, तिसरे कर्ज दिले जात आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरताना महिलांची तारांबळ उडत आहे. कर्जाचे हप्ते आठवडा, पंधरवडा व मासिक पद्धतीने भरावे लागतात. त्याच्या वसुलीसाठी एजंट कधीही महिलांच्या घरी येत असून, हातात पैसे मिळेपर्यंत ते जात नाहीत. अनेकदा मध्यरात्रीही पैशासाठी घरी येतात. महिलांना अपशब्द वापरले जात असून, धक्काबुक्की केली जाते. प्रत्यक्षात व्याजदर २४ टक्के सांगितला गेला असला तरी २८ ते ३६ टक्के व्याज घेतले जात आहे. मनाला वाटेल तो व्याजदर लावला जात आहे. तरी या प्रकरणांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर ८५ महिलांच्या सह्या केल्या आहेत. हे निवेदन देताना अझीझ सय्यद, शोभना सकपाळ, रुकसाना खान, नजमा सय्यद, मनाली कदम, शारदा सावंत, पूजा शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: सूर्यकुमार यादवने जिंकला टॉस; संजू सॅमसन-बुमराहला मिळाली संधी? पाहा प्लेइंग-११

Central Railway: फुकट्यांना मध्य रेल्वेचा दणका! ५ महिन्यांत १७ लाख प्रवासी पकडले, १०० कोटींचा दंड

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Latest Marathi News Updates Live: शॉर्टसर्किटमुळे बंगल्यात आग, आठ जणांची सुखरूप सुटका

SCROLL FOR NEXT