कोकण

आचरा रामगड प्रशालेच्या चिन्मयी शिंदेचा सत्कार

CD

78161

आचरा रामगड प्रशालेच्या
चिन्मयी शिंदेचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १७ ः आचरा पंचक्रोशी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘सहकार्यातून सेवा’ या उपक्रमांतर्गत रामगड विद्यामंदिर, रामगड या प्रशालेची होतकरू हुशार विद्यार्थिनी चिन्मयी शिंदे हिचा विशेष सत्कार करत तिला मंडळाकडून पाच हजार रुपयांची मदत दिली. यावर्षी दहावीमध्ये ९६ टक्के गुण मिळवत तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यावेळी मुन्ना बांदिवडेकर, उमेश साटम, वैभव सावंत, तेजस घाडीगावकर आणि जयदीप कुबल आदी उपस्थित होते.
आचरा पंचक्रोशी क्रिकेट क्लब या मंडळाकडून एक संकल्पित उपक्रम बांदिवडे येथील श्रीराम उर्फ मुन्ना बांदिवडेकर यांच्या संकल्पनेमधून राबविला जात आहे. या ग्रुपमधील सदस्य महिना ५० रुपये आणि त्यापेक्षा शक्य असेल, अशी रक्कम जमा करतात. पंचक्रोशीमध्ये हुशार, होतकरू पण आर्थिक दृष्टीने कुठे तरी कमी अशा मुलांची माहिती घेऊन जमा झालेल्या निधीमधून ५ हजार एवढी मदत केली जाते. यापूर्वी त्रिंबक गावामधून जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या प्रतीक्षा विश्वास परब तसेच आचरा पिरावाडीच्या श्री रामेश्वर विद्यामंदिर या प्रशालेमधील अपंग विद्यार्थी ओमकार सुनील पेडणेकर याला आर्थिक मदत केल्याची माहिती बांदिवडेकर यांनी दिली. एकजुट अजून घट्ट करून सर्व सदस्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यापुढेही चालू ठेवण्यात येईल, असे श्री. बांदिवडेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT