कोकण

राजापूर ः सामंत फाउंडेशनतर्फे निकीता गोसावींना एक लाख

CD

rat18p6.jpg
78267
राजापूरः अपूर्वाताई सामंत फाउंडेशनच्यावतीने निकिता गोसावी यांना आर्थिक मदतीचा धनादेश देताना शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, अशफाक हाजू, दीपक नागले, सर्वेश तेंडुलकर, प्रसन्न मालपेकर आदी.

सामंत फाउंडेशनतर्फे निकिता गोसावींना एक लाख
अपूर्वा सामंत यांचा पुढाकार; नाटे येथे आगीत झाले होते दुकानाचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ः मागील महिन्यात नाटे बाजारपेठेमध्ये लागलेल्या आगीमध्ये निकिता गोसावी यांच्या दुकानाचे नुकसान झाले होते. त्यांना सामंत फाउंडेशनतर्फे अपूर्वा सामंत यांनी एक लाख रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे बाधित कुटुंबाला आधार मिळाला असून, अपूर्वा यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सामंत फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या मदतीचा धनादेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या हस्ते निकिता गोसावी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, अपूर्वा सामंत यांचे स्वीय सहाय्यक सर्वेश तेंडुलकर, राजापूर कार्यालय प्रमुख प्रसन्न मालपेकर, उमेश चव्हाण, प्राजक्ता पांचाळ, मनोज आडविलकर, स्वरा भोसले, पूजा करंगुटकर, अजय बंदरकर, अल्ताफ बोरकर, साद फडणीस, आतिफ हातवडकर आदी उपस्थित होते.
मागील महिन्यात नाटे बाजारपेठेतील एका इमारतीला आग लागली होती. त्यात इमारतीमधील व्यापार्‍यांचे सुमारे २६ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेमुळे त्या व्यापार्‍यांना मोठी झळ बसली आहे. या प्रकारात गोसावी यांच्या ब्युटीपार्लरचेही मोठे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार किरण सामंत यांची कन्या अपूर्वा सामंत यांनी तत्काळ नाटे येथे भेट दिली. तेव्हा व्यापार्‍यांसह गोसावी यांच्याशी संवादही साधला होता. त्या वेळी त्यांनी निकिता यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तताही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT