कोकण

रत्नागिरी -ई-मोजणीमुळे जमीन मोजणी झाली जलद

CD

ई-मोजणीमुळे जमीन मोजणी झाली जलद
जमीनमालकांचे हेलपाटे थांबले ; अर्ज ऑनलाईन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः ई-मोजणीमुळे ग्रामीण भागातील जनतेला जमीन मोजणीसाठी सोपी, जलद आणि अचूक प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जमीनमालकांचे हेलपाटे थांबले असून, वादही कमी झाले आहेत तसेच भूमी अभिलेख विभागातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे मोजणीला होणारा विलंबही कमी झालेला आहे.
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून तालुकास्तरावर जमीन मोजणीसाठी अर्ज स्वीकारले जातात. अर्जाच्या प्राधान्याप्रमाणे आणि जमिनीच्या मोजणीसाठी लेखी अर्ज करण्यापासून तारीख मिळवणे आणि भू-करमापकांच्या उपलब्धतेनुसार मोजणीचा कार्यक्रम तयार केला जाऊन मोजणीची तारीख निश्चित केली जाते. या सर्व प्रक्रियेत अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष मोजणी होईपर्यंत पारंपरिक पद्धतीने कार्यवाही करताना येणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञानकेंद्राच्या मदतीने ‘ई-मोजणी’ ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित केली आहे.
ई-मोजणी प्रणालीत अधिकार अभिलेख (७/१२), मोजणी फीचे चलन अथवा पावती व मोजणीचा अर्ज या तीन कागदपत्रांच्या आधारे मोजणीची कार्यवाही पारदर्शकपणे केली जात आहे. कोषागारात मोजणी फीचे पैसे भरून मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा केल्यास तत्काळ मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. त्यावर मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती असते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी खातेदाराला मारावे लागणारे हेलपाटे थांबले असून, खातेदाराकडून केवळ योग्य व अचूक मोजणी फी घेतली जाते तसेच ई-मोजणीवरही ठराविक कालावधीत प्रकरण निकाली करण्याचे बंधन आल्याने खातेदारास तत्पर सेवा मिळत आहे.

चौकट
अधिकृत पोर्टलवर नोंदणी
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत https://emojni.mahabhumi.gov.in/emojni/ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केल्यावर मोजणीची तारीख निश्चित केली जाते. या दिवशी भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी येऊन मोजणी करतात. मोजणीनंतर त्याचा अहवाल ऑनलाइन उपलब्ध होतो, असे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Result: आयआयटीची पदवी आणि बड्या पगाराची नोकरी लाथडली! शेतकऱ्याचा लेक बनणार 'जिल्हाधिकारी'; पहिल्याच प्रयत्नात गाजवलं मैदान

सर्वात कमी वयात ICC ट्रॉफी जिंकणारे भारतीय; रोहित शर्मा अव्वल

Latest Marathi News Live Update : व्यावसायिकांना गॅस सिलेंडर बंद झाल्याने हॉटेल चालकाने चुलीवर स्वयंपाक करण्यास केली सुरुवात

'तन्वी प्रत्येक भांडणाआधी जाणीवपूर्वक स्मोक करून यायची' बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुचिताचा मोठा खुलासा, म्हणाली...

भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

SCROLL FOR NEXT