कोकण

मानसिकता शुद्ध असणे गरजेचे

CD

78280

मानसिकता शुद्ध असणे गरजेचे

विद्याधर कदम; सिंधुदुर्गनगरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः पावसाळ्यात एका ठिकाणी वास करणे म्हणजे वर्षावास. पावसाळ्यामध्ये धम्म उपदेश करण्यासाठी भ्रमण करणे भिक्कूंना शक्य होत नव्हते म्हणून वर्षावास कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्षावासाच्या काळात धम्म आचरणाची सुवर्णसंधी असते. मनाची मानसिकता शुद्ध असणे फार आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांनी वर्षावास प्रबोधन मालिका उद्‍घाटन प्रसंगी केले.
दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग शाखेतर्फे वर्षावास प्रबोधन मालिका उद्‍घाटन समारंभ तसेच गुणवंतांचा गौरव कार्यक्रम आषाढ पौर्णिमे दिनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था सभागृहात झाला. यावेळी श्री. कदम अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. के. चौकेकर, जिल्हा महासचिव आनंदकुमार धामापूरकर, कोकण विभाग अध्यक्ष सुधीर धामणकर, जिल्हा कोषाध्यक्ष नंदकुमार कासले उपस्थित होते. श्री. कदम म्हणाले, ‘‘आजचे विद्यार्थी समाजाचे भविष्य आहेत. त्यानुसार शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसाय करताना सामाजिक जाणीव निर्माण व्हावी.’’
कार्यक्रमामध्ये दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या तसेच पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भारतीय संविधानाची प्रत, सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नोकरी सांभाळून कायद्याची परीक्षा संपादन केल्याबद्दल संजय पाटील आणि वर्षा कासले यांचा विशेष सत्कार केला. या कार्यक्रमात महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक व्ही. आर. आरेनवरु यांनी विविध योजनांची माहिती दिली.
पुरुषोत्तम मालवणकर, चंद्रकांत जाधव, सुहास कदम, सिद्धार्थ कदम, सखाराम मालवणकर, विष्णू अनावकर, सिद्धार्थ जाधव, नरेंद्र पेंडुरकर, दुलाजी चौकेकर, हेमंत कदम, प्रवीण कदम, सचिन तांबे, सुनील पवार, भगवान कदम, वर्षा कासले, सिद्धेश्वर सावंत, व्ही आर आरेनवरु आदी उपस्थित होते. जिल्हा महासचिव आनंद धामापूरकर यांनी प्रास्ताविक केले. अॅड. संजय पाटील आणि पर्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
---
प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत
श्री. चौकेकर यांनी, ‘‘बौद्ध धम्मातील संस्कार विधी याबाबत विवेचन केले. मनाला सुसंस्कारित करण्याची ती प्रथम पायरी आहे. जे शुद्ध आहे, जे सत्य आहे, तेच बुद्ध वचन आहे. ते प्रत्येकाने आपल्या आचरणातून सिद्ध करावे. ज्या ज्या महामानवांनी समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला, त्या महामानवांच्या विचारांना अभिप्रेत कार्य आपल्याकडून घडावे. आपल्या समाजातून प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT