कोकण

रत्नागिरी- रत्नागिरीत सायबर संस्कार कार्यक्रमात

CD

rat18p10.jpg-
78302
डॉ. अक्षय फाटक

रत्नागिरीत तीन ऑगस्टला सायबर संस्कार कार्यक्रम
रत्नागिरी, ता. १८ : समाजात सध्या ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, उच्चभ्रू अशा व्यक्तींची सायबर फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी समाजावर सायबर संस्कार होण्याची गरज आहे. याकरिता रत्नागिरी नगरपालिका व रत्नागिरी पोलिसांच्या सहकार्याने तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचा सायबर संस्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.
दैनंदिन जीवनाचा एक मोठा आधार किंवा घटक झालेल्या मोबाईलचा सध्या चाललेला गैरवापर रोखण्यासाठी, तो कसा वापरावा, कसा वापरू नये या संदर्भात सायबर संस्कार कार्यक्रमात डॉ. फाटक मार्गदर्शन करणार आहेत. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारचे संस्कार त्याच्यावर गुरू आई-वडील, नातेवाईक, मित्र यांनी करायचे असतात. बालपणात आई-वडिलांनी केलेले, शाळा, कॉलेजमध्ये शिक्षकांनी केलेले आणि मित्रमंडळींच्या सहवासातले, सामाजिक संस्कारही आवश्यक असतात. यामध्ये एका नवीन संस्काराची गरज निर्माण झाली आहे ती म्हणजे सायबर संस्काराची. याकरिता हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.
एकविसाव्या शतकात भारतात डिजिटल क्रांती झाली आणि मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टींसाठी माणूस मोबाईलवर अवलंबून झाला. मोबाईलच्या उपयोगासोबतच त्याचे उपद्रव दृश्यमान झाले आणि सायबर क्राईमचा जन्म झाला. याचा परिणाम आर्थिक, नैतिक आणि चारित्र्य यावर होऊ लागला. हे सर्व रोखण्याचा प्रयत्न करायचा असेल तर सर्वांनी सायबर सज्ञान होण्याची गरज निर्माण झाली आहे. याकरिता हे व्याख्यान आयोजित केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, पालक, नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

Mumbai Doctor Case : 'तुझा पुरुषी अहंकार आता तरी..'; मुंबईतील डॉक्टर तरुणीने घेतला गळफास, 6 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय? स्तुतीसोबत असं का वागला प्रियकर फैजुल खान?

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

SCROLL FOR NEXT