कोकण

राजापूर-नाणार-सागवेत ऑटोमोबाईल हबसाठी हालचाली

CD

नाणार-सागवेत ऑटोमोबाईल हबसाठी हालचाली
रिफायनरीचे भवितव्य अंधारात; शासनाकडून जागेची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ः तालुक्यातील नाणार भागातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प स्थानिकांच्या विरोधानंतर रद्द झाला आहे. बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाला समर्थन आणि विरोध अशा दोन्ही भूमिका असल्याने येथील प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. असे असताना तालुक्यातील नाणार-सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब उभारण्यात येणार असून, तशा शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यादृष्टीने या भागांमध्ये पाहणी झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही.
या भागातील स्थानिकांकडून प्रदुषणासह अन्य मुद्द्यांन्वये झालेल्या तीव्र विरोधानंतर या भागातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यानंतर रिफायनरी प्रकल्प बारसू-सोलगाव परिसरामध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यादृष्टीने मातीपरीक्षणही करण्यात आले; मात्र या प्रकल्पाबाबतही स्थानिकांची भूमिका संमिश्र आहे. रिफायनरीच्या या साऱ्या हिंदोळ्यामध्ये आता नाणार-सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब उभारण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत.
प्रदूषण अन् पर्यावरणाची हानी या मुद्द्यावरून रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला जात असताना प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक प्रकल्पाची उभारणी व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.


प्रदूषणविरहित प्रकल्पांचे स्वागत
अमोल बोळेः जनतेचे सहकार्य मिळेल
राजापूर, ता. १८ ः तालुक्यातील नाणार, सागवे परिसरात ऑटोमोबाईल हब बनवण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली असताना अशा प्रकारचे प्रदूषणविरहित प्रकल्प बारसू सोलगाव परिसरात आल्यास येथील जनता अशा प्रकल्पांचे स्वागत करेल, अशी भूमिका बारसू, सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी समिती अध्यक्ष अमोल बोळे यांनी स्पष्ट केली आहे.
तालुक्यातील नाणार परिसरात यापूर्वी रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता; मात्र या प्रकल्पाला स्थानिक जनतेने तीव्र विरोध केल्यानंतर रिफायनरी प्रकल्प रद्द करून तो बारसू, सोलगाव, गोवळ परिसरात हलविण्याच्या हालचाली शासनामार्फत सुरू होत्या; मात्र येथेही प्रदूषणकारी प्रकल्प म्हणून रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. तरीही, शासनाने वर्षभरापूर्वी बारसू परिसरात प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम पूर्ण केले होते; मात्र, त्याचा अहवाल अद्यापही जनतेसमोर आलेला नाही. त्यामुळे ऑटोमोबाईल हब उभारण्याच्या हालचालींबाबत अमोल बोळे म्हणाले, प्रदूषणविरहित प्रकल्पांचे स्वागत आहे. राजापूर तालुक्यातील तरुणांचे स्थलांतर, बेरोजगारी सोडवण्यासाठी शासनाने बारसू परिसरात प्रदूषणविरहित प्रकल्प आणले तर शासनाला येथील जनतेचे सर्व सहकार्य राहील. अशा प्रकल्पांसाठी लागणारी जमीन देण्यासाठी येथील शेतकरी तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor injured: प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान मोठी दुखापत; पाटणामधील रूग्णालयात उपचार सुरू!

Shocking! अनेकांसोबत शारीरिक संबंध; १०० कोटी उकळले, 'ती' महिला नेमकी कोण? धक्कादायक सत्य समोर

Pahalgam attack: 'टीआरएफ'चा जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश; भारताकडून निर्णयाचं स्वागत

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT