78340
‘रोटरी क्लब’मुळे गरजूंना उभारी
संग्राम पाटील; कुडाळात पदग्रहण सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः रोटरी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्था असून रोटरीच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व गरजू लोकांना उभारी देणारे सर्वोत्तम कार्य या संस्थेच्या माध्यमातून लाखो सदस्यांनी केले आहे. विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्ती या संस्थेच्या माध्यमातून योगदान देत असतात. रोटरी क्लब ऑफ कुडाळ गेली ३१ वर्षे कुडाळमध्ये दर्जेदार प्रकल्प यशस्वी करत आहेत याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वार्षिक पदग्रहण सोहळ्यानिमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे माजी प्रांतपाल संग्राम पाटील यांनी व्यक्त केले.
येथील रोटरी क्लबचा वार्षिक पदग्रहण समारंभ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये झाला. यावेळी रोटरी सिंधुरत्न बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले. अधिकारी संग्राम पाटील (कोल्हापूर), उपप्रांतपाल डॉ. विनया बाड, कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे, गव्हर्नर एरिया अॅड. डॉ. विद्याधर तायशेटये, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, राजेश घाटवळ, उपप्रांतपाल डॉ. प्रशांत कोलते व सचिन मदने, नगरसेविका चांदनी कांबळी, कुडाळचे मावळते अध्यक्ष डॉ. संजय केसरे, नूतन अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ. सानिका मदने, सचिव सौ. सई तेली, खजिनदार सौ. गितांजली कांदळगावकर, पीडीसी डॉ. सायली प्रभू, आयएसओ सौ. मेघा भोगटे, गजानन कांदळगावकर, डॉ. संजय सावंत, शशी चव्हाण, प्रमोद भोगटे, का. आ. सामंत, संजय पिंगुळकर, राजन बोभाटे, डॉ. रविंद्र जोशी, डी. के. परब, एकनाथ पिंगुळकर आदी उपस्थित होते.
तहसीलदार वसावे यांनी रोटरी क्लबचा सदस्य असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. वर्षभरात मुलींसाठी सायकल वाटप, शिलाई मशिन्स वाटप, डेस्कबेंच वितरण, सौर उर्जा किट वितरण असे विविध उपक्रम यशस्वी करूयात, असे आवाहन उपप्रांतपाल डॉ. बाड यांनी केले. मावळते अध्यक्ष डॉ. केसरे यांनी विविध समाजपयोगी उपक्रम यशस्वी करता आल्याचे सांगितले.
यावर्षीचा रोटरी व्होकेशनल पुरस्कार सरंबळचे प्रगतशील सेंद्रीय भाजीपाला शेतकरी सुरेश परब यांना मिळाला. राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ पडतेवाडीच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ. सुरेखा कदम-कोकितकर मिळाला. यावेळी रवींद्र परब, डॉ. जी. टी. राणे यांना मुंबई रोड रनर्सकडून बेस्ट हाफ मॅरेथॉन आयोजनाबाबत पुरस्कार मिळल्याबाबत तसेच डॉ. राजवर्धन देसाई, डॉ. शिल्पा पवार, प्रणय तेली यांची रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी इंटरनॅशनल कन्व्हेनशनपदी निवड झाल्याबद्दल, सचिन मदने यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कुडाळचे प्रसिद्ध सर्जन डॉ. अनिकेत वजराटकर व सुधेंद्र डोकोजू यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सदस्यत्व देण्यात आले. यावेळी मधुरा नाईक,भार्वी नाईक, डॉ. सुमेध सावंत व डॉ. समृध्दी सावंत, वेदांत मदने, ओम नाईक, अनुश्री परूळेकर, ऋतुश्री केसरे, गौरिश तेली, नुपूर परब, क्रांती पवार, निल कांदळगावकर, अन्वी कांदळगावकर आदी गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. राजवर्धन देसाई, डॉ. जयश्री केसरे यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद नाईक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.