78344
सिद्धेश माणगावकर
78345
अमित पारकर
देवगड ‘युथ फोरम’ची कार्यकारिणी बिनविरोध
अध्यक्षपदी अॅड. माणगांवकर; सचिवपदी अमित पारकर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः येथील ‘युथ फोरम’ संस्थेच्या अध्यक्षपदी अॅड. सिद्धेश माणगांवकर यांची तर सचिवपदी विनायक उर्फ अमित पारकर यांची फेरनिवड करण्यात आली. पुढील पाच वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. तसेच पाच वर्षांसाठी शहर कार्यकारिणीही स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी ओंकार सारंग यांची निवड करण्यात आली.
युथ फोरम संस्थेच्या सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच संस्थेचा पाचवा वर्धापनदिनही साजरा करण्यात आला. यावेळी मागील कालावधीचा आढावा अॅड. माणगावकर यांनी घेताना, संस्थेने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नवे धोरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच त्यांच्या हिताच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी युनिट स्थापन करण्यात येणार असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न राहिल, असे सांगितले. युथ फोरमच्या महाविद्यालयीन विद्यार्थी युनिटच्या अध्यक्षपदी दीपक जानकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी देवांत गांवकर, पूर्वा चौगुले, सचिवपदी सलोनी कदम, सहसचिवपदी स्नेहा भस्मे, तनिष नाईक, वेदिका धुवाळी, पार्थ नाईकधुरे, कार्यकारिणी सदस्य म्हणून आचल वर्मा, स्वराज आचरेकर, भूपेश हरम, माहेश्वरी कोयंडे, वैभवी घारकर, पियुष केतकर, ओम गांवकर यांची निवड झाली. पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्र दिले. संस्थेतर्फे ‘अॅक्टिव्हिस्ट ऑफ दी इअर २०२५’ हा पुरस्कार ऋत्विक धुरी यांना देण्यात आला. सचिव अमित पारकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे, अमित पारकर यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. अमित पारकर यांनी प्रास्ताविक केले. ऋत्विक धुरी यांनी सूत्रसंचालन केले. भूषण दातार यांनी आभार मानले.
....................
संस्थेची नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष -अॅड. सिद्धेश माणगावकर, सचिव -विनायक उर्फ अमित पारकर, उपाध्यक्ष -प्रणव नलावडे, खजिनदार -सागर गांवकर, सहसचिव -रसिका सारंग, ऋत्विक धुरी, सदस्य -प्रथमेश माणगांवकर, आकाश सकपाळ, अॅड. श्रुती माणगांवकर, प्रणव पारकर, भूषण दातार तर निमंत्रित सदस्य -अपेक्षा सकपाळ, शहर कार्यकारिणी -उपाध्यक्ष -जितेश मोहिते, सचिव -आज्ञा कोयंडे, सहसचिव -विनय पराडकर, शुभम महाजन, सदस्य -हर्षित कोयंडे, रुद्रा शेट्टे, राधा जगताप, श्रवण बांदेकर, श्रेयस कडू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.