कोकण

‘कर्करोग चिकित्सा करा, धोका टाळा’

CD

78361
‘कर्करोग चिकित्सा करा, धोका टाळा’
परुळेत व्हॅन दाखल; नागरिकांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १८ : ग्रामीण भागात कर्करोगाचे निदान लवकर होऊन त्वरित उपचार मिळावेत, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोबाईल कर्करोग निदान व्हॅन जिल्ह्यात फिरत असून, गुरुवारी (ता. १७) ती परुळे आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामपंचायत परुळे बाजार येथे दाखल झाली. सकाळी ९ ते ४ या वेळेत ग्रामस्थांची चिकित्सा करण्यात आली. याला परुळे पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, माजी सभापती शिक्षण व आरोग्य नीलेश सामंत, सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडाचे सरपंच नीलेश सामंत, मेढा निवतीचे सरपंच अवधूत रेगे, केळूसचे सरपंच योगेश शेटये, परुळेचे माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, उपसरपंच संजय दुधवडकर, सदस्य सुनाद राऊळ यांसह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्‍त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शेटकर, दंत शल्यचिकित्सक डॉ. मणेर, नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेत मुखाचा, स्तनाचा, गर्भाशयाच्‍या कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांवर शासनामार्फत डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचार केले जातील. तसेच उपस्थित रुग्णांचे रक्तदाब, रक्त, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी व आयुष्‍मान, आभा कार्ड काढण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अश्विनी माईनकर, डॉ. शलाका सावंत, डॉ. सागर पवार यांनी केले आहे. यावेळी ग्रामपंचायत परुळेबाजार, कुशेवाडा, म्हापण, केळूस, कोचरा, निवती-मेढा, भोगवे, चिपी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोबाईल व्हॅन तपासणीला प्रारंभ केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT