78375
ओरोसमध्ये नर्सरी व्यवस्थापन,
कलम बांधणीबाबत मार्गदर्शन
आरोस माऊली विद्यालयात शिबिर
बांदा, ता. १९ ः माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय, आरोस-दांडेली येथे बँक ऑफ इंडिया व माऊली महिला मंडळ, शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी व्यवस्थापन व कलम बांधणी प्रशिक्षण शिबिर उत्साहात झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माऊली महिला मंडळ अध्यक्षा रेखा गायकवाड, समाजसेविका अलका नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाच्या संचालिका श्रीमती कुडतरकर, आजगाव सरपंच सौ. यशश्री सौदागर, श्रीमती गाडगीळ तसेच मंडळाच्या सदस्या श्रीमती कदम, बँक ऑफ इंडियाचे श्री. कासले आदी उपस्थित होते. ‘स्वावलंबी आयुष्य कसे जगावे व छोट्या उद्योगांतून मोठे यश कसे मिळवावे’ या विषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले व उपस्थितांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संस्थेच्या अध्यक्षा रेखा गायकवाड या वयाची ८० वर्षे झालेली असतानासुद्धा दिव्यांग व सर्वसाधारण मुलांसाठी असे प्रशिक्षण राबवित त्यांना स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातून त्यांची विद्यार्थी व त्यांच्या आयुष्यासाठी असलेली तळमळ दिसून येते, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. आर. व्ही. काळे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक एस. एस. उकरंडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.