कोकण

गुहागर-पोफळी मार्गालगत ३१ जुलैपर्यंत वृक्षलागवड

CD

गुहागर-पोफळी दुतर्फा
३१ जुलैपर्यंत वृक्षलागवड
चिपळूण, ता. १८ ः गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावर गुहागर ते पोफळीदरम्यान ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी उपोषण स्थगित केले.
सामाजिक कार्यकर्ते शाह, निसर्गप्रेमी समीर कोवळे, अजित जोशी, मंदार चिपळूणकर, दिगंबर सुर्वे यांनी आज राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता नाझिम मुल्ला, सहाय्यक अभियंता शाम कुणेकर, तांत्रिक सल्लागार पंकज शर्मा, तसेच मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रसाद जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शाह म्हणाले, गुहागर ते रामपूर, साखरवाडी ते उक्ताड आणि बहादूरशेख ते पिंपळीदरम्यान रस्त्याची दुरुस्ती झाली आहे. रामपूर ते साखरवाडी, पिंपळी ते कुंभार्ली घाटमाथ्यापर्यंतचा रस्ता हस्तांतरित झाला आहे. ठेकेदाराने चिपळूण शहर व परिसरातून जाणाऱ्या मार्गालगत वृक्ष लागवड करणे आवश्‍यक आहे. ही लागवड कधीपर्यंत पूर्ण होईल, अशी विचारणा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना केली, तेव्हा त्यांनी ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शाह यांनी उपोषण मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT