कोकण

बांदा रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

CD

78384

‘बांदा रोटरी’च्या अध्यक्षपदी शिवानंद भिडे

क्लबचे पदग्रहण; सचिवपदी स्वप्नील धामापुरकर

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः येथील रोटरी क्लबचा २०२५-२६ वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा श्री स्वामी समर्थ हॉल येथे उत्साहात झाला. यावेळी शिवानंद भिडे यांनी अध्यक्षपदाची, स्वप्नील धामापुरकर यांनी सचिवपदाची आणि सुदन केसरकर यांनी खजिनदाराची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन जिल्हा सचिव अमित मेटे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राजेश घाटवाल, डॉ. विद्याधर तयशेटे आणि डॉ. विनया बाड उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष दिगंबर गायतोंडे, क्लब ट्रेनर मंदार कल्याणकर, इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट सीताराम गावडे, क्लब लर्निंग फॅसिलिटेटर प्रमोद कामत, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर आनंद गावस, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी अप्पा चिंदारकर, फाउंडेशन चेअर मनसुख वसानी, सर्जंट ॲट आर्म्स हनुमंत शिरोडकर, सॅनिटेशन चेअर दिलीप घोगले, सदस्य विभागप्रमुख नरसिंह काणेकर, आपत्ती व्यवस्थापनप्रमुख स्वगत नाटेकर आणि बुलेटिन संपादक म्हणून विराज परब यांची निवड करण्यात आली. यावेळी यशवंत आळवे, साईराज साळगावकर आणि दत्ताराम पावसकर यांचा क्लबमध्ये नवीन सदस्य म्हणून समावेश केला.
या कार्यक्रमात समाजसेवक प्रभाकर शिरसाट आणि डॉ. संजय बर्वे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शिक्षणात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कार्यकारिणी सदस्य, तसेच संतोष सावंत, स्वागत नाटेकर, अप्पा चिंदरकर, सिद्धेश पावसकर, सुधीर शिरसाट, प्रवीण शिरसाट, आनंद गावस, योगेश परुळेकर, नरसिंह काणेकर, आबा धारगळकर, दिलीप घोगले, दिलीप कोरगावकर, डॉ. एन. नाईक, प्रसाद सातार्डेकर, रत्नाकर आगलावे, शीतल राऊळ, फिरोज खान, रवी गवस आदी उपस्थित होते. स्वप्नील धामापुरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT