कोकण

उड्डाणपूल वाढीव भागाचे काय झाले?

CD

78366.

उड्डाणपूल वाढीव भागाचे
काय झाले? ः उपरकर

कणकवलीप्रश्नी भाजपला प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १८ ः शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचा एस. एम. हायस्कूलकडील भाग अजूनही नादुरुस्त आहे. तो भाग काढून तेथे नवीन पिलर टाकून उड्डाणपूल वाढविण्यात येणार असल्याचे भाजप नेते प्रमोद जठार यांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, त्यापुढील कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने भाजपने याचे उत्तर द्यावे, असे शिवसेना नेते माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते हे सध्या प्रभारी आहेत. जिल्ह्याच्या नव्या अधीक्षक अभियंत्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही. पाटबंधारे विभागात एका अभियंत्यांकडे तीन विभागांचा कार्यभार आहे. पोलिस विभागातही उपविभागीय अधिकारी व अन्य वरिष्ठ पदे रिक्त आहेत. या सर्व रिक्‍तपदांचा जिल्ह्याच्या विकासकामांवर मोठा परिणाम होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ते म्‍हणाले, ‘‘पालकमंत्री नीतेश राणे यांनी वाढवण बंदराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, त्या रोजगारासाठी आवश्यक कौशल्य देणारे अभ्यासक्रम अभियांत्रिकी किंवा अन्य महाविद्यालयांमध्ये सुरू झालेले नाहीत. दहावी-बारावीनंतर विद्यार्थी आयटीआयमध्ये जाऊन कौशल्य शिक्षण घेतात. मात्र, तेथेही शिक्षकांची कमतरता असल्याने ही संधीही दुर्लक्षित आहे.’’
------
महामार्गावरील खड्डे बुजविलेच नाहीत!
महामार्ग व रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत खासदार नारायण राणे यांनी नुकतीच बैठक घेतली. मात्र, कार्यकारी अभियंतेच उपलब्ध नसल्याने खड्डे बुजविण्याची कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही. परिणामी, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्ती खड्ड्यांतूनच आणाव्या लागतील, अशी संतप्त भावना जनतेमध्ये व्यक्त होत आहे. मालवण-राजकोट येथे प्रस्तावित असलेली शिवसृष्टी ही लगतच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साकारल्यास पर्यटनाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरेल, असेही मत व्यक्त करण्यात आले. किल्ल्याचे सुशोभिकरण आणि पर्यटकांसाठी सुविधा निर्माण झाल्यास तेथील पर्यटकांची संख्या निश्चितच वाढेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT