कोकण

डम्पिंग ग्राउंडची ३ कोटींची जमीन साडेपाच कोटींना

CD

तीन कोटींची जमीन साडेपाच कोटींना
विनायक राऊत ः नगरपंचायत प्रशासनावर टीका
(मेन २ च्या शेजारी)
सकाळ वृत्तसेवा
लांजा ः कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राउंडची अडीच ते तीन कोटींची जमीन तब्बल साडेपाच कोटींना दिली. निम्मे पैसे मालकाला, निम्मे पैसे नेत्यांना, गद्दारांसहित सर्वांना, अशा शब्दात माजी खासदार विनायक राऊत यांनी कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राउंडमधील कथित भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले.
एका कार्यक्रमानिमित्ताने माजी खासदार विनायक राऊत हे शुक्रवारी (ता.१८) लांजा येथे आले होते. या वेळी त्यांनी नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका केली. लांजा नगरपंचायत प्रशासनाच्या जोरजबरदस्ती कारभारावर कडाडून टीका करताना माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की, लांजा शहरातला कचरा दुसरीकडे टाकला पाहिजे, या गोष्टीला मी सहमत आहे; परंतु कोत्रेवाडीत हा कचरा नेऊन टाकायचा आणि तिथे काय जनावरे राहतात का? तिथे पण माणसेच राहतात ना? आता सध्या एवढे रोग येत आहेत की, त्यामुळे कोत्रेवाडी येथे कचरा टाकला तर असलेले सर्व रोग हे कोत्रेवाडीवासीयांना डसतील, असा हल्लाबोल त्यांनी नगरपंचायत प्रशासनावर केला .
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Engineer Drug Dealer : सॉफ्टवेअर इंजिनिअर वृषभ बनला ड्रग्ज डिलर, नशेने आयुष्याची राख रांगोळी, विमानाने दिल्ली... ट्रकने कोल्हापूर प्रवास

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

Manikrao Kokate Video : शेतकरी दररोज जीवन संपवतोय अन् कृषीमंत्री विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट

'स्लीपिंग प्रिन्स' अल-वलीद बिन खालेद यांचं निधन; सौदी अरेबियातील राजघराण्यावर शोककळा, 20 वर्षे होते कोमात, असं काय घडलं त्यांच्याबाबतीत?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी

SCROLL FOR NEXT