कोकण

कुडाळ-वालावल बस फेऱ्या पूर्ववत करा

CD

78489


कुडाळ-वालावल बस फेऱ्या पूर्ववत करा

आय. वाय. शेख; काँग्रेसतर्फे आगारप्रमुखांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः कुडाळ-वालावल मार्गावरील बंद बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्याबाबतची मागणी कुडाळ आगार प्रमुखांकडे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस सचिव आय. वाय. शेख यांनी केली. वालावल गाव व परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून बससेवेच्या अडचणींमुळे त्रस्त आहेत. कुडाळ आगारातून सुटणाऱ्या विविध बस फेऱ्या बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, नोकरदारांचा प्रवास तसेच ग्रामीण भागांतील नागरिकांचे दैनंदिन जीवन समस्याग्रस्त बनल्याबाबत त्यांनी निवेदन देऊन लक्ष वेधले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘कुडाळ-वालावल मार्गावरील अनेक बस फेऱ्या बंद आहेत. यामध्ये सकाळी ५.५० वाजता सुटणारी कुडाळ-वालावल-माऊली मंदिर ही बस अनेक दिवसांपासून बंद आहे. सद्यस्थितीत या मार्गावर धावणाऱ्या वस्तीतील प्रवाशांसाठी असलेल्या बसेस प्रचंड गर्दीमुळे भरून जातात. त्यामुळे विद्यार्थी तसेच कुडाळला बाजारासाठी जाणारे विक्रेते, ग्राहकांना प्रवास करणे शक्य होत नाही. हीच अडचण लक्षात घेता ही सकाळची फेरी सुरू केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कुडाळ बाजाराच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होत असे. शाळा आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुडाळ येथे किंवा तिथून पुढे जाण्यासाठी लागणारी अन्य मिळविणे या फेरीमुळे शक्य होत असे. त्यामुळे ही फेरी पुन्हा त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. दुपारी साडेबाराला सुटणारी कुडाळ-वालावल-माऊली मंदिर ही फेरी वेळेवर आणि नियमितपणे चालविणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी या फेरीची वाट पाहत असतात. सद्यस्थितीत या फेरीची वेळ अचूक न ठेवल्यामुळे त्यांना बस मिळण्यात मोठी अडचण होते. अनेकदा उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना उभे राहून किंवा बसचा पास असूनही इतर पर्याय शोधावा लागतो. यामुळे शारीरिक व मानसिक नुकसान होते. त्यामुळे ही बस वेळेवर आणि प्रत्येक दिवशी नियमितपणे चालवावी. दुपारी १.१५ ची कुडाळ-वालावल-कवठी ही बस गेल्यानंतर थेट ३.२० वाजता पुढील बस उपलब्ध होते. या दरम्यान जवळपास दोन तासांपर्यंत वालावलच्या दिशेने एकही बस येत नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालय संपल्यानंतर परत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे दुपारी २.१५ वाजता सुटणारी कुडाळ-वालावल-माऊली मंदिर-कोरजाई ही फेरी तत्काळ सुरू करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT