कोकण

केसरकरांकडून वाढदिनानिमित्त सिंधुदुर्गाच्या समृध्दासीठी साकडे

CD

78492


केसरकरांकडून वाढदिनानिमित्त
सिंधुदुर्गाच्या समृद्धीसाठी साकडे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सुखी-समाधानी ठेव, त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ दे. कोकणातील प्रत्येक घरात आर्थिक समृद्धी निर्माण होवो आणि हा जिल्हा सुजलाम् सुफलाम् होऊ दे, यासाठी आम्हा सर्वांना बळ दे, असे साकडे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथील साईबाबांचरणी व मुंबई येथे सिद्धिविनायक व महालक्ष्मी मंदिरात घातले.
आमदार केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांना राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक, मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या. केसरकर यांनी मुंबईत सकाळी सिद्धिविनायक व महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेत आपला वाढदिवस आध्यात्मिक वातावरणात साजरा केला. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांत शिवसैनिक तसेच मित्रमंडळी यांनी विविध संस्था, शाळांमध्ये तसेच गोरगरीब मुलांना आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा केला. सावंतवाडी येथे श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT