-rat१९p११.jpg-
२५N७८५०८
चिपळूण ः रखडलेले महिला क्रीडासंकूल.
----
चिपळुणातील प्रकल्प नियमावलीत अडकले
पालिकेचे अपयश; मटणमार्केट, महिला क्रीडासंकूलचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः गेल्या २० वर्षांपासून चिपळूण शहरातील विविध प्रकल्पांना खीळ बसली आहे. नगरपालिकेने हाती घेतलेले प्रकल्प कधी राजकारण, कधी मूल्यांकन तर कधी तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्यावरच अडकले आहेत. महर्षी कर्वे भाजीमंडई, मटणमार्केट, महिला क्रीडासंकूल, पवन तलाव क्रीडांगणासारख्या प्रकल्पांना प्रशासकीय कारभारात पूर्ण होण्याची अपेक्षाही आता मावळली आहे.
येथील पालिकेने २००५च्या पूरपरिस्थितीनंतर शहरातील काही प्रकल्पांना नव्याने चालना देण्याचा प्रयत्न केला. कोकणातील पहिले बंदिस्त नाट्यगृह म्हणून ओळख असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. हे काम सुरू असतानाच महर्षी कर्वे भाजीमंडई, मटणमार्केट व मच्छीमार्केट, पवन तलाव क्रीडांगण, नारायण तलाव सुशोभीकरण, महिला क्रीडासंकुलासारखी कामे एकावेळी सुरू केली. तब्बल १५ वर्षे यातील बहुतांशी प्रकल्प रखडले आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम कसेबसे पूर्णत्वास गेले.
शहरातील रावतळे परिसरात उभारण्यात येत असलेल्या महिला क्रीडासंकुलाच्या बाबतीतही तितकीच उदासीनता आहे. शहरातील महिलांसाठी बहुउद्देशीय क्रीडासंकुल उभारून तेथे बचतगट व अन्य महिला संघटनांना सामावून घेण्याचा प्रयत्न होता; परंतु अनेक वर्षे या प्रकल्पाचे काम अर्धवट आहे. याच पद्धतीने पवन तलाव क्रीडांगणाचे कामही वर्षानुवर्षे रखडले आहे. या कामातही लाखो रुपयांचा निधी खर्च करून कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत.
गेल्या २० वर्षाहून अधिक रखडलेल्या मटण व मच्छीमार्केटच्या इमारतीतील गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली असली, तरी अद्याप या इमारतीचे काम अधिकृतपणे पूर्ण झालेले नाही. संबंधित प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा दाखला पालिकेला अद्याप मिळालेला नाही. अशा परिस्थितीत ३० वर्षासाठी लिलावात देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
चौकट
भाजीमंडईचे ५४ गाळे लिलावाविना
महर्षी कर्वे भाजीमंडईच्या इमारतीची रचना चुकीच्या पद्धतीने केल्याने त्याचा फटका बसला आहे. प्रशासनाने या प्रकल्पातील गाळ्यांसाठी तब्बल ९ वेळा लिलाव प्रक्रिया राबवली; परंतु त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. इमारतीच्या दर्शनी भागातील शॉपिंग सेंटरमधील गाळे सुरू असले तरी भाजीमंडईतील ५२ ओटे व ५४ गाळे लिलावात गेलेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.