कोकण

भजनी कलाकार संस्थेतर्फे आज मसुरे येथे कार्यशाळा

CD

भजनी कलाकार संस्थेतर्फे
आज मसुरे येथे कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. १९ ः मालवण तालुक्यातील सर्व संगीत, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, तबलावादक, झांज वादक, कीर्तनकार, कोरस, नवोदित कलाकार, अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांच्या स्थापन झालेल्या ‘भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग’ला शासन दरबारी मान्यता मिळाली आहे. या संस्थेतर्फे
तालुकास्तरीय कार्यशाळा उद्या (ता. २०) सकाळी ९ वाजता मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.
संस्थेचे कार्यकारी मंडळ व या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा विचारविनिमय करण्यात येणार आहे. यावेळी मसुरे येथील प्रसिद्ध उद्योजक तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. दीपक मुळीक परब, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक तथा ज्येष्ठ कामगार नेते प्रकाश परब, भजन सम्राट तथा मानधन समिती सिंधुदुर्गचे सदस्य भालचंद्र केळुसकर, माजी सभामती तथा मानधन समिती सिंधुदुर्गचे सदस्य अजिंक्य पाताडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी कलाकार मानधन विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन, भजन कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर, कलाकारांसाठी असलेल्या शासकीय योजनांबाबत शासन पाठपुरावा करणे, नवीन सदस्य नोंदणी, ज्येष्ठ कलाकारांना मार्गदर्शन अशा विविध प्रश्नांसंदर्भात नियोजन करण्यासाठी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT