कोकण

जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करा

CD

जन्म-मृत्यू नोंदणीतील अडचणी दूर करा
आमदार शेखर निकम ः नागरिकांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः विलंबाने जन्म वा मृत्यू नोंदणीच्या प्रक्रियेत ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणींवर पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी शासनाचे लक्ष वेधले. ही फक्त कागदपत्रांची नव्हे तर नागरिकांच्या अस्तित्वाची, ओळखीची आणि मूलभूत हक्कांची बाब आहे, असे निकम यांनी सांगितले.
शासननिर्णय १२ मार्च २०२५ नुसार, एका वर्षानंतरची जन्म-मृत्यू नोंदणी करण्यासाठी अधिकृत रुग्णालयीन वा वैध सरकारी पुराव्यांची सक्ती करण्यात आली आहे. १५ ते २० वर्षांपूर्वीच्या घटनांमध्ये अशा दस्तऐवजांची अनुपलब्धता ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा अडथळा ठरत असल्याची बाब आमदार निकम यांनी मांडली. ग्रामपंचायत दाखले, शाळेतील प्रमाणपत्रे वा प्रतिज्ञापत्र असूनही अर्ज नाकारले जातात. परिणामी, आधारकार्ड, शिक्षण, नोकरी, वारसहक्कसारख्या अत्यावश्यक सेवा व सुविधा मिळवताना अडथळे निर्माण होतात. यासाठी पर्यायी कागदपत्रांना वैधता द्यावी, जुन्या प्रकरणांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती लागू करावी, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि निबंधकांना स्पष्ट व सुसंगत निर्देश द्यावेत, ई-गव्हर्नन्सच्या युगात शासनाने नागरिकहिताचे धोरण स्वीकारून अशी विलंबित नोंदणी प्रक्रियाही सुलभ करावी, अशी मागणी आमदार निकम यांनी सभागृहात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: शिवराय नसते तर आपल्याला शाळेत शिकावी लागली असती इराणची भाषा; काय आहे इतिहास?

जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाची बॅग अन् सरकारी पिस्तूल चोरीला; वांद्रे रेल्वे स्थानकातील घटना...

Yermala News : एसटी प्रवास रोखण्यामागे NCMC कार्ड सक्तीचा डाव? परिवहन विभागाच्या दंडराजवर संताप, राज्य सरकारविरोधात खळबळ

Latest Marathi News Live Update : इस्रायल-इराण संघर्ष परिस्थितीमुळे लोकांसाठी आम्ही वेबसाइट आणि हेल्पलाइन नंबर जारी केलाय - गिरीश महाजन

Nashik News : नाशिकची अनोखी परंपरा! धुलिवंदनाला वीरांच्या मिरवणुकांनी दुमदुमली दक्षिण गंगा

SCROLL FOR NEXT