कोकण

मंत्री उदय सामंतांची अधिवेशनात दमदार कामगिरी

CD

मंत्री उदय सामंतांनी मांडले २४ लक्षवेधी
अधिवेशनात नऊ विधेयक ; निकम, जाधवही चमकले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : राज्याच्या विधिमंडळाचे १५ दिवसांचे पावसाळी अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. या अधिवेशनात राज्यासह कोकणातील विविध विकासांचे प्रश्न आणि मुद्द्यांवर आमदार शेखर निकम, भास्कर जाधव अग्रही राहिले. याबरोबर संपूर्ण अधिवेशन उपस्थित राहून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली कामगिरी पार पाडली.
२४ लक्षवेधी, ९ विधेयक, पुरवणी मागण्यांवरील चर्चेतही त्यांनी सहभाग घेत दमदार कामगिरी केली. विरोधी पक्षातून उबाठाचे भास्कर जाधव यांनी देखील अनेक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. एकंदरीत, जिल्ह्यातील नेत्यांच्या कामगिरीने अधिवेशन गाजले.
अधिवेशन सुरू झाल्यापासूनच कोकणच्या विकासाचे अनेक विषय सभागृहात चर्चेला आले. आमदार निकम यांनी विविध प्रश्नांवर लक्ष वेधले, पालकमंत्री सामंत यांनी या चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः, कोकणमधील पायाभूत सुविधा, पर्यटन विकास, स्थानिक उद्योगांना चालना आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासंदर्भातील अनेक प्रश्न त्यांनी मांडले. केवळ प्रश्न मांडून ते थांबले नाहीत तर त्यावर शासनाच्या स्तरावर काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही सभागृहाला त्यांनी दिली.
सामंत यांच्याकडे उद्योग आणि नगरविकास या दोन महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी आहे. त्यांनी राज्यातील नव्या औद्योगिक धोरणांची माहिती, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी उचललेली पावले आणि बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनांवर प्रकाश टाकला. राज्याच्या आर्थिक विकासात उद्योग विभागाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी अधोरेखित केले तसेच, नगरविकास विभागासंदर्भात त्यांनी शहरांच्या नियोजित विकासाचे मुद्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणी, पाणीपुरवठा आणि स्वच्छतांसारख्या नागरी समस्यांवर उत्तरे दिली.

चौकट
मंत्री सामंत यांनी २४ लक्षवेधींवर मांडली या लक्षवेधी विविध खात्यांशी संबंधित होत्या आणि त्यांनी त्यावर अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. दोन्ही सभागृहांतील प्रश्नोत्तरांच्या तासात त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. सभागृहात सादर झालेल्या ९ शासकीय विधेयकांच्या चर्चांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुरवणी मागण्यांवरील चर्चेतही त्यांनी सहभाग घेऊन आपल्या विभागांसाठी आवश्यक निधीची बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT