कोकण

खंडाळ्यात संरक्षण प्रकल्पाला तीव्र विरोध

CD

-rat१९p२९.jpg-
२५N७८५९६
रत्नागिरी ः खंडाळा येथे प्रस्तावित संरक्षण विभागाच्या प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.
-----
खंडाळ्यात संरक्षण प्रकल्पाला विरोध
शेतकऱ्यांचा मोर्चा ; कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : तालुक्यातील खंडाळा येथे प्रस्तावित संरक्षण शस्त्र सामग्री उत्पादन प्रकल्पाविरोधात आज जोरदार एल्गार देत स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. प्रकल्पासाठी सुरू असलेली जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.
मोर्चानंतर खंडाळा येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या प्रकल्पाचे पर्यावरणीय आणि सामाजिक दुष्परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकला. स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास त्यांची शेती आणि उपजीविकेची साधने हिरावली जातील तसेच, या भागातील नाजूक पर्यावरणावर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे; मात्र शनिवारच्या या भव्य मोर्चामुळे हा विरोध अधिकच तीव्र झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनापुढे आणि उद्योग विभागापुढे एक मोठे आव्हान आहे.

चौकट...
विदर्भ, मराठवाड्यात प्रकल्प उभारावा
कोकणात जे उत्पन्न होते ते इतर ठिकाणी होऊ शकत नाही. अशा वातावरणात इथे कारखाना का आणायचा? जो दुसरीकडे लावू शकतो. विदर्भामध्ये नापीक जमीन खूप आहे. मराठवाड्यात खडकाळ जमीन खूप आहे तिथे आत्महत्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. सरकारने असा प्रकल्प तेथे उभारावा, असे अॅड. असीम सरोदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT