कोकण

लायन्स क्लब समाजसेवेमध्ये अग्रेसर

CD

78713

लायन्स क्लब समाजसेवेमध्ये अग्रेसर

डॉ. किरण खोराटे; कुडाळात नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः ‘‘समाजात सामाजिक बांधिलकी जोपासून ‘लायन्स’ ही सेवाभावी संस्था मानवतेची, समाजाची सेवा करत आहे. ही आंतरराष्ट्रीय संस्था गरजवंतांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर आहे,’’ असे प्रतिपादन डॉ. किरण खोराटे यांनी केले. येथील लायन्स क्लबच्या पदग्रहण (२०२५-२६) सोहळ्यात डॉ. खोराटे बोलत होते. नूतन पदाधिकारी पदग्रहण, गुणवंत सत्कार व गरजवंतांना मदत, असा हा सोहळा संगीतमय वातावरणात दिमाखात पार पडला.
यावेळी नूतन अध्यक्ष आनंद कर्पे, ‘पीएमजेएफ’ सीए अजित फाटक, झोनल चेअरमन अमेय पै, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सचिव सागर तेली, खजिनदार जीवन बांदेकर, रोटरी क्लब कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, सचिन मदने, मकरंद नाईक आदी उपस्थित होते.
डॉ. खोराटे म्हणाले, ‘‘लायन्स’ ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. कोणतेही काम करताना टीमवर्क महत्त्वाचे आहे. ‘लायन्स’चे २१० देशांत सेवाभावी काम सुरू आहे. कोविडमध्ये कोट्यवधी रुपये मदतीसह विविध सामाजिक उपक्रमांत लायन्स क्लब अग्रेसर राहिला आहे.’’
कुडाळ लायन्स क्लबच्या माध्यमातून काम करताना सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रांत काम करणार आहे. विविध उपक्रमांसह अंधत्व निवारण, भूक निवारण, पर्यावरण संवर्धन असे विविध उपक्रम राबविणार असल्याचे नूतन अध्यक्ष कर्पे यांनी जाहीर केले. यावेळी विविध क्षेत्रांत योगदान दिलेले डॉ. विवेक पाटणकर, मिलिंद बांदिवडेकर, शालेय विद्यार्थिनी नुपूर कर्पे यांचा लायन्स क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. पाट येथील कुलदीप नेरुरकर या युवकाला आरोग्य उपक्रमांतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात आले. यावेळी लायन्स नूतन सभासद म्हणून उद्योजक सुधीर झाडये, डॉ. योगिता राणे, श्रीकृष्ण शिरोडकर, रमेश जोशी यांना क्लबमध्ये घेण्यात आले. स्नेहा नाईक, शोभा माने यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. अस्मिता बांदेकर यांनी आभार मानले.
.................
नव्या वर्षासाठी नवी टीम सज्ज
अध्यक्ष कर्पे, सचिव सीए सागर तेली, खजिनदार जीवन बांदेकर, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, उपाध्यक्ष आनंद बांदिवडेकर, शैलेश मुंडये, मंदार शिरसाट, सहसचिव डॉ. दीपाली काजरेकर, सहखजिनदार गणेश म्हाडदळकर, तेमर डॉ. सुशांता कुलकर्णी, चैतन्य तेरसे, मिलिंद बांदिवडेकर, नयन भणगे, अॅड. नारायण वैद्य, अॅड. अमोल सामंत, जयंती कुलकर्णी, मंजुनाथ फडके, सुनेत्रा फाटक, सीए अजित फाटक, जी. दत्ताराम, अॅड. अजित भणगे, सीए सुनील सौदागर, काका कुडाळकर, मनोहर कामत, अॅड. समीर कुळकर्णी, डॉ. अमोघ चुबे, मंदार परुळेकर, अॅड. श्रीनिवास नाईक, अनंत शिंदे, नयन भणगे, स्नेहांकिता माने, अस्मिता बांदेकर, डॉ. विवेक पाटणकर, डॉ. गौरव घुर्ये, चिन्मय सामंत, देविका बांदेकर, प्रशांत माने, अॅड. मिहीर भणगे, डॉ. चेतना चुबे, डॉ. सिद्धेश बांदेकर, मेघा सुकी, यूथ प्रोग्राम अनुप तेली, संतोष वारकणकर, मनोज मठकर, राजन कोरगावकर, सुजाता तेली, श्रद्धा खानोलकर, गजानन तेली, विशाल देसाई, मिलिंद बोर्डवेकर, सूरज भोगटे, कुणाल वरसकर, प्रकाश जैतापकर, प्रकाश नेरुरकर, अॅड. संग्राम देसाई, विवेक धुरी, चिरायू बांदेकर, सुधाकर कुलकर्णी, संजीवकुमार प्रभू, रोहन सामंत, कपिल शिरसाट, नितीन दळवी, सतीश सामंत ही नवी टीम नव्या वर्षात काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

Ganpati Visarjan 2025: 'फलटणला दगडफेक; १३ जणांना अटक', जिंती नाक्‍यावर दोन मंडळांच्‍या कार्यकर्त्यांचा राडा

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदी उद्या पंजाबमधील पूरग्रस्त भागाचा करणार दौरा, आर्थिक मदतीची घोषणा करण्याची शक्यता

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'Avocado Paneer Toast', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT