rat20p28.jpg
78796
राजापूर ः आबासाहेब मराठे महाविद्यालयात मार्गदर्शन करताना प्रा. अभिजित शेवडे.
------------
मराठे महाविद्यालयात
डॉ. पाटील यांची जयंती
राजापूर, ता. २१ ः रयत शिक्षण संस्थेचे तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राजाराम राठोड, या वेळी हिंदी विभागाचे प्रा. अभिजित शेवडे, उपप्राचार्य डॉ. संजय मेस्त्री, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अतुल भावे आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे जीवन व कार्य या विषयावर प्रा. शेवडे यांनी माहिती सांगताना त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि घटना सांगितल्या.