कोकण

भाताची आदिम बियाणी

CD

जपूया बीज वारसा---------लोगो
(१५ जुलै टुडे ३)

सृष्टीज्ञानच्या आदिम भातबियाणी संवर्धन या प्रकल्पांतर्गत पिकवल्या जाणाऱ्या भाताच्या प्रजातींचे शरदचंद्र पवार शेतकी महाविद्यालय, सावर्डे येथे डीएनए परीक्षण करण्यात आले असून, त्यानुसार या तांदळामध्ये विशिष्ट गुणधर्म आढळून आले आहेत.

-rat२१p१.jpg -
25N78885
- कुणाल अणेराव,
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था
---
भाताची आदिम बियाणी
महाडी, सोनफळ, वालय ः कोकणातील लाल रंगाच्या या स्थानिक प्रजाती तुडतुड्या या किडीला तोंड देण्यात आणि दुष्काळात तगून राहण्यास सक्षम आहेत. खाऱ्या जमिनीतही उत्तम पीक येते. यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि इतर सूक्ष्म पोषणमूल्ये असल्याने आजारपणातून उठल्यावर तसेच हाड मोडणे आणि जखमा भरून यायला मदत होते म्हणूनच याची पौष्टिक पेज बाळंतीण महिलांना सकाळी प्यायला दिली जाते. याची पेज करण्यापूर्वी हा तांदूळ स्वच्छ धुवून चौपट पाण्यात तासभर भिजत ठेवावा आणि त्याच पाण्यात मंद आचेवर शिजवावा.
*धने साळ, जोंधळी जिरगा, सफेद कोथिंबीर ः ही प्रजाती तुडतुड्या आणि गादमाशी या किडीला सक्षमपणे तोंड देते. याचे दाणे धन्याप्रमाणे गोलसर बुटके असून, शिजवल्यावर कोथिंबिरीप्रमाणे सुगंध येतो. कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण सण दोरे सोडणे (गौरीच्या वौशाला बांधलेले दसऱ्यानंतर सोडतात.) या दिवशी आवर्जून धने, साळ, तांदळाची खीर किंवा भात केला जातो. हा भात नेहमीच्या पद्धतीने शिजवावा तसेच या तांदळाच्या पिठाचे घावणे आणि मोदक चांगले होतात.
राजगुड्या, अश्विनी, कमल, सोरटी, झिणी, कोलम ः बाजारात मागणी असणारे आणि भरपूर उत्पादन देणारे हे वाण आहेत. कोकणात पडणारा भरपूर पाऊस झेलायची क्षमता असणारे त्याचबरोबर स्थानिक किडीला तोंड देणारे आणि खार जमिनीतही उत्तम उत्पादन हे वाण देतात. यातील बरेचसे तांदूळ शिजवल्यावर सडसडीत होतात. हे भात नेहमीच्या पद्धतीने शिजवावे.
जावयाची गुंडी ः उत्तम चव आणि हवामानातील कोणत्याही बदलांना सामोरे जाण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. त्यामुळे जर काहीच पिकले नाही तरी जावयाला याचा भात नक्की देऊ शकतो म्हणून या तांदळाचे नाव जावयाची गुंडी असे आहे. हा भात नेहमीच्या पद्धतीने शिजवावा.
*काळाभात ः मूलत: ईशान्य भारतात होणारा ‘चकहाओ’ हा काळा तांदूळ आम्ही कोकणात पिकवत आहोत. तांदूळ काळा दिसत असला तरी शिजवल्यावर भाताचा रंग जांभळा दिसतो. शिजवण्यापूर्वी हा तांदूळ किमान तीन तास भिजत ठेवावा आणि मग शिजवावा. खाताना हा भात दळदार आणि खूप चावून खावा लागतो. या भाताला हा जांभळा रंग त्यात असलेल्या ‘अॅन्थोसियानिन’ या प्रथिनामुळे येतो. डोळ्यांना सुखावणाऱ्या जांभळ्या रंगाबरोबरच या भाताची चव उत्तम असते आणि कर्बोदके, तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिनेसारखी उच्च दर्जाची पोषणमूल्ये असतात. हा तांदूळ मुख्यत: त्यांच्यातील अँटिऑक्सिडेंटससाठी प्रसिद्ध आहे. अशा उच्च दर्जाच्या पोषणमूल्यांमुळे चीनमध्ये हा तांदूळ केवळ राजांसाठी शिजवला जायचा. या भाताची खीर आणि पेज छान बनते. हा भात नुसताच मीठ, तूप घालून अथवा दूध, ताक घालून खाल्ला तर चांगला लागतो. भातच उत्तम असल्याने त्याच्यासोबत अजून काही खायला घ्यावे लागत नाही आणि त्यात सर्व पोषणमूल्ये असल्याने खऱ्या अर्थाने वन पॉट मील आहे.
*सोनामुखी ः मूलत: ओदिशा येथील स्थानिक वाण असलेल्या सोनामुखी या तांदळाची आम्ही कोकणात यशस्वी लागवड केली आहे. या तांदळाला हे नाव त्याच्या दाण्यांवर असलेल्या पिवळ्याधमक सोनेरी तुसामुळे मिळाले आहे. उत्तम चव आणि मोकळा शिजणारा हा भात कोकणातील हवमानाचे सर्व चढ-उतार सहज झेलतो. हा भात नेहमीच्या पद्धतीने शिजवावा.
सध्या लोकही भात खाण्याबाबत जागृत झाले असल्याने या स्थानिक वाणाच्या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या तांदळाला चांगली मागणी येते आहे. शेतकऱ्यांकडून थेट तांदळाची खरेदी केली जात आहे, हे खूपच आश्वासक चित्र आहे.

(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : सकाळी ६ वाजता पुन्हा सुरू झाला डी जे चा दणदणाट, पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष अखंड

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT