कोकण

धामणसे ग्रामपंचायतीला तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान

CD

rat२१p१९.jpg-
२५N७८९२४
रत्नागिरी : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीबद्दल धामणसे ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार प्रदान करताना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे.

‘प्रधानमंत्री आवास’मध्ये धामणसे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : ग्रामपंचायत धामणसेला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धामणसेत ५१ घरकूल बांधण्यात आली आहेत. तालुक्यात केंद्र व राज्यशासन पुरस्कृत महाआवास योजनेच्या २०२४-२५ मध्ये उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींचा व वैयक्तिक लाभार्थ्यांचा गौरवसोहळा आज स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवनात झाला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते धामणसे ग्रामपंचायतीचे सरपंच अमर रहाटे, तत्कालीन उपसरपंच अनंत जाधव, सदस्या ऋतुजा कुळकर्णी, वैष्णवी धनावडे, सदस्य समीर सांबरे व संजय गोनबरे, ग्रामविकास अधिकारी इंगळे यांनी सत्कार स्वीकारला. धामणसे गावातील सुवर्णा रहाटे यांना उत्कृष्ट घरकुल लाभार्थी म्हणून गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी विजयसिंह जाधव आणि गटविकास अधिकारी चेतन शेळके प्रमुख उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार अंत्योदयाचा विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाचा निधी पोहोचवून खर्च करण्याचे काम सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रामाणिकपणे करत असल्यानेच धामणसे ग्रामपंचायतीला हे यश मिळाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत धामणसें व ग्रामस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
----
कोट
गावकऱ्यांनी या कामांना नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला असून, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या एकजुटीनेच हे यश शक्य झाले आहे. येत्या काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील.
- अमर रहाटे, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test: इंग्लंडच्या संघात ८ वर्षांनी 'त्या' गोलंदाजाचे पुनरागमन! मँचेस्टर कसोटीसाठी दोन दिवस आधीच प्लेइंग-११ जाहीर

Nalasopara Murder: खळबळजनक! नालासोपारात 'दृश्यम' सारखी घटना; पतीचा मृतदेह घरातच पुरला अन् वरून फरशीही बसवली, मात्र...

Jagdeep Dhankhar Resigns: मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने दोन प्रकरणात ईडीला फटकारले; ''तुमचा वापर कशासाठी केला जातोय?''

Ration Card: आता 'या' नागरिकांचे रेशन होणार कायमचे बंद, पहा यादीत तुमचं तर नाव नाही ना? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT