कोकण

भविष्यवेधी शिक्षणाने प्रगती निश्चित

CD

swt216.jpg
78937
कुडाळः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने पालकमंत्री नीतेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. बाजूला प्रभाकर सावंत व मान्यवर. (छायाचित्रः अजय सावंत)

भविष्यवेधी शिक्षणाने प्रगती निश्चित
नीतेश राणेः कुडाळात विद्यार्थी परिषदेतर्फे गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः पुढील २५ वर्षांमध्ये आपला देश कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहे, याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्याप्रमाणे शिक्षण घ्यावे. आपल्या भविष्यातील नोकऱ्या, उद्योग उभे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मराठा समाज हॉल येथे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे बंड्या सावंत तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक विनीत परब, कॉमर्स अॅकॅडमी संचालक सीताराम प्रभूदेसाई, शहर मंत्री दिग्विजय पवार, कार्यक्रम प्रमुख आर्या सावंत, सहशहर मंत्री अलविना फर्नांडिस आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्यकर्ते, नेते, नोकरदार व उद्योजक सुद्धा घडले आहेत. त्यामुळे हे व्यासपीठ विद्यार्थ्यांना घडविणारे आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म् अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. पुढील काळामध्ये कोणत्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, याचा अभ्यास आताच करून त्या पद्धतीचे शिक्षण घेणे महत्त्वाचे बनले आहे. सध्या एआय शिक्षण पद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या क्षेत्रामध्ये भविष्यात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच स्पर्धाही वाढणार आहे. त्याचाही विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. अशा कार्यक्रमांकडे मी एक गुंतवणूक म्हणून पाहत आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भविष्य आहेत. जिल्ह्यातील उद्योगांमध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिकता देण्यासाठी प्राधान्य राहील. विविध कौशल्य प्रशिक्षणे देण्याचा आमचा मानस आहे."
सूत्रसंचालन कस्तुरी राऊळ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test: इंग्लंडच्या संघात ८ वर्षांनी 'त्या' गोलंदाजाचे पुनरागमन! मँचेस्टर कसोटीसाठी दोन दिवस आधीच प्लेइंग-११ जाहीर

Nalasopara Murder: खळबळजनक! नालासोपारात 'दृश्यम' सारखी घटना; पतीचा मृतदेह घरातच पुरला अन् वरून फरशीही बसवली, मात्र...

Jagdeep Dhankhar Resigns: मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने दोन प्रकरणात ईडीला फटकारले; ''तुमचा वापर कशासाठी केला जातोय?''

Ration Card: आता 'या' नागरिकांचे रेशन होणार कायमचे बंद, पहा यादीत तुमचं तर नाव नाही ना? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT