कोकण

कौशल्य शिक्षणामध्ये रोजगाराची संधी

CD

swt217.jpg
78938
कसालः तेली समाज संघटनेच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांसोबत मान्यवर.

कौशल्य शिक्षणामध्ये रोजगाराची संधी
तुकाराम तेलीः कसालमध्ये तेली समाज संघटनेतर्फे गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ः तेली समाजातील अनेक विद्यार्थी ९० टक्केपेक्षा गुण मिळवून यशस्वी झाले, ही समाजाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्य विकास शिक्षणावर भर देऊन आपली प्रगती साधा, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली यांनी केले.
कसाल येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे कुडाळ तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि समाज बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी कुडाळ तालुका तेली समाज संघटनेचे अध्यक्ष दिलीप तिवरेकर, सचिव परशुराम झगडे, चंद्रकांत तेली, मधुकर बोर्डवेकर, सुप्रिया वालावलकर, रवींद्र कांदळकर, बापू तळवडेकर, गुरुदास तेली, धोंडू सातार्डेकर, हूमरस सरपंच सीताराम तेली, गोपाळ वेंगुर्लेकर, बाळा कांदळकर, सुहास आजगावकर, रामदास कामतेकर, शैलेश डिचोलकर, बाळा सातार्डेकर आदी उपस्थित होते.
श्री. तेली म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज संघटना जिल्ह्यात चांगले काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीच्या मुख्यमंत्री गुप्ता यांसारखे अनेक लोकप्रतिनिधी तेली समाजाचे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक विचार करून एक चळवळ निर्माण करण्याचा आणि गावागावांतील संघटन मजबूत करण्याचे काम सर्वांनी मिळून करू. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. कौशल्य शिक्षणातून विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी. आजच्या काळात सोशल मीडियासारखे शिक्षण, माहिती तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी वापर करावा. समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा. समाजाच्या विकासासाठी संघटना नेहमीच कटिबद्ध आहे.’’
या कार्यक्रमात दहावी, बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रशांत आजगावकर, तर आभार सचिव अमित धामापूरकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : सकाळी ६ वाजता पुन्हा सुरू झाला डी जे चा दणदणाट, पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष अखंड

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT