कोकण

लोटेत गॅस पाइपलाइनसाठी खोदाई

CD

- rat२१p१४.jpg
P२५N७८९११
ःखेड ः खोदलेल्या बाजूपट्ट्यातून रूतलेला मालवाहू ट्रक.

लोटेत गॅस पाइपलाइनसाठी खोदाई
अपघाताला निमंत्रण; वाहनांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांना गॅसपुरवठा करण्यासाठी अंतर्गत रस्त्यांच्या खोदलेल्या बाजूपट्ट्या अपघाताला कारणीभूत ठरत असून, अनेक वाहनांचे नुकसान होत आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांना गॅसपुरवठा करण्यासाठी मार्च, एप्रिल महिन्यांत अंतर्गत रस्त्यांच्या कडेने पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली. जवळपास १२ किलोमीटरच्या परिसरात ही खोदाई करण्यात आली; मात्र, ती करताना औद्योगिक विकास महामंडळाची परवानगी घेतली होती की नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. याबाबत चिपळूणच्या खेर्डी येथील कार्यालयाकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. मंगळवारी दुपारी एक वाजता येथील ए. बी. मौरी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बाराचाकी माल भरलेला कंटेनर रुतला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवली गेली होती. मागील महिन्यातही हिंदुस्थान यु‌निलिव्हर या कंपनीसमोरही एक ट्रक रुतला होता. या भागातील संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले असून, त्यातून वाहने चालवणे कठीण बनले आहे. त्याबाबत अनेकदा ओरड होऊनही औद्योगिक विकास महामंडळ दुर्लक्ष करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारने कोट्यवधींचं बिल थकवलं, कंत्राटदाराने स्वत:ला संपवलं; तिजोरीत खडखडाट तरी कंत्राट वाटप, जयंत पाटलांचा हल्लाबोल

Rishabh Pant Injury Update : रिषभ पंतची दुखापत.. स्टेडियमबाहेर अ‍ॅम्ब्युलन्स, शुभमन गिलची पळापळ अन् BCCI चे अपडेट्स... काल नेमकं काय घडलं?

Petrol Pump: पेट्रोल पंपातून होतेय लाखोंची कमाई! लायसन्स कसं मिळवायचं? किती पैसे लागतात?

Stock Market Opening: शेअर बाजार घसरला; निफ्टी 25,200च्या खाली, कोणते शेअर्स वाढले?

Explainer: संविधान मांसाहाराबद्दल काय म्हणते, ते विकणे आणि खाणे हा मूलभूत अधिकार आहे का?

SCROLL FOR NEXT