कोकण

मळगावात ''गुरु अभिवादन'' सोहळा उत्साहात

CD

swt2117.jpg
78959
मळगावः गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘गुरु अभिवादन’ सोहळ्याप्रसंगी गुरुवर्य दीप्तेश मेस्त्रींसह मान्यवर व विद्यार्थीवर्ग.

मळगावात ‘गुरु अभिवादन’ सोहळा उत्साहात
गुरु-शिष्य नात्याचे दर्शनः विद्यार्थ्यांच्या गायन-वादनाने रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः गुरुवर्य संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री यांनी स्थापन केलेल्या न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा ‘गुरु अभिवादन’ सोहळा काल (ता. २०) मळगाव येथे थाटात पार पडला. संगीतमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात गुरू आणि शिष्य यांच्या अतूट नात्याचे दर्शन घडविले.
गुरुपूजनाबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, नाट्यगीत, बंदिश गायन सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्या वतीने मळगाव येथील श्री भगवती हॉल येथे या भव्य अशा ‘गुरू अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचे यंदाचे १२ वे वर्ष होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गणेशमूर्तीला वंदन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शेवाळे, तळवणे मठाधिपती तथा सावंतवाडी संस्थानचे राजगुरू राजेंद्रस्वामी भारती महाराज, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय माजी उपसचिव शांताराम कुदळे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ओरोस शाखा व्यवस्थापक रोहित सोनकवडे, ॲड. चंद्रशेखर गावडे, सचिन देसाई, आनंद माळकर आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी संस्थेच्या गायन, हार्मोनियम, शास्त्रीय संगीत तसेच तबला, बासरी वादन, शास्त्रीय कथ्थक नृत्य आदी वर्गांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘जय जगदीश हरे’ प्रार्थनेने संगीतमय सोहळ्याला सुरुवात झाली. गुरुवर्य दीप्तेश मेस्त्री यांनी बरवा रागातील ‘बाजे मोरी पायलिया’ ही बंदिश सादर केली. विद्यार्थ्यांनी अभंग, नाट्यगीत, बंदिश गायन सादरीकरण केले.
सहभोजनानंतर विद्यार्थ्यांचे गायन झाले. सायंकाळी मुख्य गुरुपूजन सोहळा पार पडला. पंचारती ओवाळत गुरुवर्य मेस्त्री यांचे औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्येष्ठ विद्यार्थ्यांच्या भैरवी गायनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. मयूर पिंगुळकर, अमित मेस्त्री, पप्पू घाडीगावकर, मनीष तांबोसकर तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद आडेलकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काका सावंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष चंद्रशेखर गावडे, सचिव गीतेश परब, सल्लागार सचिन देसाई, आनंद माळकर, सहसचिव रोहित निर्गुण, खजिनदार दर्शिता मेस्त्री, अजित पोळजी, सुधीर राऊळ आदींनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video : पुण्यात भीषण अपघात ! फरश्या घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकची तीन वाहनांना धडक, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही पुत्रांचा आज भाजपमध्ये प्रवेश

IND vs AUS 1st T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम आजपासून: भारत-ऑस्ट्रेलिया लढत Live कुठे पाहाल, जाणून घ्या वेळ

Tulsi Vivah 2025: यंदा तुळशीचे लग्न 2 कि 3 नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

CM Devendra Fadnavis: बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात ११ हजार कोटी जमा होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT