कोकण

रत्नागिरी सीए शाखेतर्फे चिपळुणला चर्चासत्र

CD

rat२२p३.jpg-
P२५N७९१२८
चिपळूण : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित चर्चासत्रात सीए शेखर पटवर्धन यांचे स्वागत करताना अध्यक्ष सीए मंदार जोशी.
---
सीए शाखेतर्फे चिपळूणला चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने खेर्डी, चिपळूणमधील हॉटेल तेज ग्रँड येथे नुकतेच चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राला चिपळूण आणि परिसरातील बहुसंख्य सीए उपस्थित होते.
प्रास्ताविक रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी केले. त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयोजित विविध उपक्रम, चर्चासत्र आणि आगामी काळात कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे याची माहिती दिली. सकाळच्या सत्रामध्ये डोंबिवली येथील सीए शेखर पटवर्धन यांनी २०२५च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे या विषयावर मार्गदर्शन केले. आयकर कायद्यामध्ये झालेल्या बदलांबाबत चर्चा झाली. दुपारच्या सत्रामध्ये ठाणे येथील सीए राजेश आठवले यांनी भांडवली नफ्यावरील ठळक मुद्दे या विषयावर मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती दिली.
अशा चर्चासत्रांमुळे दरवेळी नवनवीन येणाऱ्या कायदे व नियमांबाबत माहिती मिळते, असे सर्व सभासदांनी आवर्जून सांगितले. सूत्रसंचालन सीए अनामय बापट यांनी केले. सीए सुमेध करमरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Crime : दरोडे, हप्ता वसुलीचे गंभीर गुन्हे; कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय गोकुळ झा याची कुंडलीच समोर

Harmanpreet Kaur: मन जिंकलंस पोरी! शतकानंतर मिळालेला POTM पुरस्कार युवा खेळाडूसोबत शेअर केला; Emotional Video

Latest Maharashtra News Updates : डान्सबार चालवणारा गृहराज्यमंत्री नको : अंजली दमानिया

Radhakrishna Vikhe Patil: फडणवीसांची शिर्डीवर विशेष मर्जी: राधाकृष्ण विखे पाटील; भाजप नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

U17 Wrestling Championship : भारताचे कुस्तीपटू मॅटवर उतरण्याआधीच चितपट? १७ वर्षांखालील स्पर्धा; ग्रीस दूतावासाकडून व्हिसाची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT