कोकण

-सायबर सिक्युरिटीवर माखजन हायस्कुलमध्ये मार्गदर्शन

CD

सायबर सिक्युरिटीवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल व ॲड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन करण्यात सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक उपस्थित होते.
माखजन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सहसचिव दीपक शिगवण, संचालक सुभाष सहस्रबुद्धे, मुख्याध्यापिका रूही पाटणकर, विवेक ढोल्ये, सोहम बापट, अरुण फाटक उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. फाटक यांनी दैनंदिन जीवनात मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी या विषयी सखोल माहिती दिली. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम ही ॲप वापरताना कोणती काळजी घ्यावी, पासवर्डला किती महत्त्व आहे या विषयी सविस्तर माहिती सांगितली. सोशल मीडिया हाताळताना सुरक्षितता कशी बाळगावी यावरही मार्गदर्शन केले. आजच्या पिढीला सायबर संस्कारांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे डॉ. फाटक यांनी शंकानिरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : विद्यापीठाच्या क्रमवारीतील घसरणीमुळे अधिसभा सदस्यांच्या सामूहिक राजीनाम्याची मागणी

Explained: औषधांशिवाय रक्तवाहिन्या निरोगी ठेवायच्या आहेत? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' 4 सोपे उपाय

LinkedIn New Feature: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता लिंक्डइनची विश्वासार्हता वाढवणारी नवीन योजना सुरु; जाणून घ्या काय आहेत याचे वैशिष्ट्ये

Asia Cup 2025: टीम इंडिया कोणत्या Playing XI सह मैदानावर उतरणार? प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची हिंट...

Maratha-Kunbi Debate: सोलापूरच्या सेवा सप्ताहातील ‘मराठा-कुणबी’ चर्चेत; मंत्री भुजबळांचा आक्षेप, जरांगे पाटील जिल्हाधिकाऱ्यांना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT