कोकण

राजापूर-गट, गणांच्या पुनर्रचनेवर १३ हरकती

CD

गट, गणांच्या पुनर्रचनेवर १३ हरकती
राजापूर तालुका : पाचल गटाचे नाव न बदलण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ः आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे सहा तर पंचायत समितीचे बारा गण झाले आहेत. पुर्नरचना करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावर तालुक्यातून १३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १२ हरकती पाचल विभागातील असून, एक हरकत देवाचेगोठणे विभागातून दाखल झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट आणि गणांचे प्रारूप आराखडे तयार केले आहेत. गट आणि गणांच्या नव्याने करण्यात आलेल्या पुनर्रचनेमध्ये जिल्हा परिषदेचे सहा आणि पंचायत समितीचे बारा गण कायम आहेत; मात्र गट आणि गणांच्या नावांमध्ये बदल होताना काही गावांची अदलाबदल झाली आहे. गट आणि गण यांच्या पुनर्रचनेबाबत हरकती नोंदवण्याच्या निर्धारित कालावधीत तालुक्यातून १३ हरकती दाखल झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.
यामध्ये पूर्वीच्या पाचल गटाचे नाव तळवडे असे झाले आहे. त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामध्ये पाचल गट असेच नाव ठेवावे, अशी मागणी पाचल ग्रामपंचायतीसह, सरपंच बाबालाल फरास, संजय पाथरे, विनायक सक्रे, पूजा शिगम, चैतन्य पाथरे, शंकर पाथरे, ओंकार ताम्हणकर, विशाल भिंगार्डे, किशोर नारकर, राजेंद्र रेडीज, सिकंदर फरास यांनी हरकतीद्वारे मागणी केली आहे.
---------
चौकट
गोवळ, साखरीनाटे गावांबाबत हरकत
देवाचेगोठणे पंचायत समिती गणामध्ये पूर्वी समाविष्ट असलेल्या गोवळ गावाचा नव्या रचनेमध्ये धोपेश्‍वर गणामध्ये समावेश झाला आहे. त्यावर हरकत घेताना गोवळ समावेश पूर्वीप्रमाणे देवाचेगोठणे गणामध्ये करण्याची मागणी करण्यात आली आहे. पूर्वीच्या साखरीनाटे गणामधून साखरीनाटे हे गाव वगळून त्याऐवजी नवीन झालेल्या गणाला आडिवरे-वाडापेठ ही गावे जोडण्यात आली आहेत. यावर आक्षेप घेताना पूर्वीप्रमाणे साखरीनाटे गावाचा त्याच गणामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ही हरकत अमजद बोरकर, मनोहर गुरव, सिद्धेश मराठे, वसंत आंबेलकर, दिलीप फोडकर, प्रशांत पांचाळ आदींनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM KP Sharma Oli : नेपाळच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा! ; 'पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर, सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही'

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

Bidkin Accident : अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुचाकीचा अपघात; एक तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT