कोकण

मडुरा परिसरात ‘लंपी’ फैलावल्यामुळे भीती

CD

79272

मडुरा परिसरात ‘लंपी’
फैलावल्यामुळे भीती

वासरांमध्ये प्रमाण वाढले

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः मडुरा पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या मडुरा, रोणापाल व निगुडे गावांत गुरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. प्रामुख्याने नवजात वासरांमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. लंपीच्या प्रादुर्भावामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मडुरा गावात मोठ्या प्रमाणात दुधाळ जनावरे आहेत. राज्याच्या दुधाळ जनावरे खरेदी योजनेतून जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी गाई व म्हशी खरेदी केल्या आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांचा दुग्ध उत्पादन हा मुख्य शेतीपूरक व्यवसाय आहे. मडुरा, रोणापाल व निगुडे गावातून मोठ्या प्रमाणात दूध संकलन होते.
राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लंपीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत सध्या लंपीग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. मडुरा, रोणापाल व निगुडे गावांत आतापर्यंत १८ गुरांना लंपीची लागण झाली आहे. त्यापैकी १५ गुरे या रोगातून बरी झाली असून तीन वासरांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. फणसेकर यांनी दिली.
...................
कोट
लंपी हा रोग नीथलिंग व्हायरसमुळे होतो. यात गुरांना ताप येणे, त्वचेवर फोड येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे गुरांमध्ये दिसल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात तातडीने संपर्क साधावा. लंपीग्रस्त जनावरे या आजारातून बरी झालेली आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
- डॉ. एस. पी. फणसेकर, पशुवैद्यकीय अधिकारी, मडुरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताच जयतं पाटील मतदारसंघात, कार्यकर्ता बैठकीत काय झाली चर्चा...

Suraj chavan Arrest : मारहाण भोवली ! अखेर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणला अटक, मध्यरात्री पोलिसांना शरण अन्...

Marathwada Rain : पावसाने खरीप पिकांना आधार; मराठवाड्यात ठिकठिकाणी सरी, काही मंडळांत अतिवृष्टी

माेठी बातमी! 'शनिशिंगणापुर ऑनलाईन ॲप घोटाळ्यात पुरोहित रडारवर'; चौकशीचा फेरा सुरू, स्वयंघोषित मुख्य पुजारी चर्चेत

Pharmacy Admissions : ‘बी फार्मसी’ प्रवेशात ‘तारीख पे तारीख’, औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश अर्जासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

SCROLL FOR NEXT