कोकण

''आंबोली–चौकुळ''मधील विद्यार्थ्यांना गावडेंकडून स्टील थर्मस बॉटल्स

CD

79426

‘आंबोली–चौकुळ’मधील विद्यार्थ्यांना
गावडेंकडून स्टील थर्मस बॉटल्स
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी वाढदिनानिमित्त आंबोली–चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील शाळेतील विद्यार्थ्यांना स्टीलच्या थर्मस बॉटल्सचे वाटप केले.
श्री. गावडे दरवर्षी आपला वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करतात. गेली दहा वर्षे ते आंबोली–चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने योगदान देत आहेत. यामध्ये आरोग्य मदत, शैक्षणिक साहित्य वाटप आणि गरजू महिलांना मदत अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. त्यांनी यंदाही चौकुळ, आंबोली, केसरी, दाणोली, सातोळी, बावळट, विलवडे आणि भालावल यांसारख्या विविध गावांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना स्टीलच्या थर्मस बॉटल्सचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापक भरत गावडेंसह इतर मान्यवर व गावडे मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT