कोकण

कासरल ग्रामपंचायतीमध्ये कृषी माहिती केंद्राचे उद्‍घाटन

CD

79443

कासरल ग्रामपंचायतीमध्ये
कृषी माहिती केंद्राचे उद्‍घाटन

कणकवली, ता. २५ : उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत कृषिदूतांच्या पुढाकारातून कासरल ग्रामपंचायतीमध्ये कृषी माहिती केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे केंद्र ठरणाऱ्या या उपक्रमाचे उद्‍घाटन सरपंच स्नेहा परब यांच्या हस्ते झाले.
उपसरपंच मनोहर मांडवकर, पोलिसपाटील उदय सामंत, कृषी विस्तारतज्ज्ञ डॉ. विलास सावंत, प्रगतशील शेतकरी संदीप राणे, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते. केंद्रात फळरोपे, बागायती पिके, मसाला पीक, पालेभाज्या लागवड पद्धती, फवारणीची काळजी, कीड व बांडगूळ नियंत्रण, कंपोस्ट व जीवामृत तयार करण्याच्या पद्धती यांसह अनेक विषयांवर माहिती फलकांद्वारे माहिती उपलब्ध करून दिली आहे. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पिकांच्या जाती, बांडगूळ नियंत्रणासाठी ‘अमर हत्यार’, फळमाशी नियंत्रणासाठी ‘रक्षक सापळे’ यांसारखी माहितीही या केंद्रात दिली जात आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी होते. त्यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. कीटकशास्त्रतज्ज्ञ डॉ. संदीप गुरव यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. कृषिदूत प्रतीक शेंडे, शुभंकर शेंडे, अनस बुरोंडकर, पारस कारेकर, अजय गोडसे, प्रेमाराम चौधरी आणि साहिल यादव यांनी सहभाग घेतला. शुभंकर शेंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रतीक शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. पारस कारेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT