कोकण

कणकवली : युवासेना आंदोलन इशारा

CD

79570

कणकवली-कुंभवडे मार्गावरील बसफेऱ्या अनियमित
विद्यार्थ्यांना मोठा त्रासः सेवा सुरळीत न झाल्‍यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २४ ः कणकवलीहून कुंभवडे मार्गावर धावणाऱ्या एस.टी. फेऱ्या अनियमित आहेत. तब्‍बल अडीच ते तीन तास उशिराने एस.टी.सुटत असल्‍याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सकाळी नऊ वाजता बाहेर पडलेले विद्यार्थ्यांना रात्री नऊ वाजता घर गाठावे लागत आहे. येत्‍या पंधरा दिवसांत कुंभवडे मार्गावरील एस.टी. फेऱ्या नियमित सोडण्याची कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिला.
कुंभवडे मार्गावरील एस. टी. फेऱ्यांबाबत युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती कुबडे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख व एस.टी. कामगारसेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, युवासेना कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री आदी उपस्थित होते.
कुंभवडे गावात दुपारी १२.१५ वाजता पोचणारी एस. टी. बस तब्बल २.३० वाजता पोहोचते, तर सायंकाळी ५.४५ वाजता कुंभवडे गावात पोचणारी एस. टी. बस गाडी रात्री ८.३० पर्यंत पोहोचते. यात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच मधल्या वेळेतील बस रद्द केल्या जातात. त्‍यामुळे बसमध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्‍याची बाब उत्तम लोके यांनी मांडली.
सुशांत नाईक म्हणाले, एस. टी.च्या अनियमित फेऱ्यांमुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्‍यामुळे दुपारी आणि सायंकाळी कुंभवडे गावात जाणाऱ्या एस. टी. बसेस वेळेवर सोडाव्यात जेणेकरून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी लवकर आपल्‍या घरी पोचू शकतील.
दरम्‍यान दारिस्ते गावासाठी सकाळी ९ वाजता सुरू असलेली एस. टी. सेवा बंद केल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना सुमारे दीड किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे. ही अडचण दूर करून दारिस्ते एस.टी. सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी अशीही मागणी श्री.नाईक यांनी केली.
कुंभवडे गावातील एस. टी.फेऱ्या येत्‍या पंधरा दिवसांत वेळेवर सोडण्यात याव्यात. अन्यथा एस. टी. कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुशांत नाईक आणि उत्तम लोके यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चा उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चा; दिला निर्वाणीचा इशारा

मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं... ! वैभव सूर्यवंशीने व्यक्त केल्या भावना; VVS Laxman अन् इशान किशन यांच्याबद्दल म्हणाला...

Chef Kunal's Masoor Dal Pulao: रोजच्या जेवणाचा कंटाळा आला? मग शेफ कुणाल कपूरचा मसूर डाळ पुलाव एकदा करून पाहाच!

अनेकदा मागणी करूनही डिंपल कपाडियांनी राजेश खन्नांना घटस्फोट का दिला नाही? लिव्ह इन पार्टनरने सांगितलं खरं कारण

Commonwealth Games 2026 : पदकाच्या अपेक्षा घेऊन, तो ग्लास्गोत आला अन् पहिल्याच फेरीत बाद झाला; गुरिंदरवीर सिंगच्या Exit ने भारताला धक्का...

SCROLL FOR NEXT