कोकण

गोगटे विद्यामंदिरमध्ये विद्यार्थिनींना सायकल

CD

79586

गोगटे विद्यामंदिरमध्ये
विद्यार्थिनींना सायकल
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ः जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांच्या वतीने जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमधील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. अजित गोगटे यांच्या उपस्थितीत संबंधित विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक सुनील जाधव उपस्थित होते.
जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग ही संस्था जिल्ह्यातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थिनींना आपल्या सायकल बँकमधून सायकली प्रशालांकडे सुपूर्द करतात. ज्या मुलींना या सायकली वितरित केल्या जातात, त्या मुलींनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या प्रशालेला परत करायच्या असतात. अशा परत करण्यात आलेल्या सायकली पुन्हा नवीन लाभार्थी विद्यार्थिनींना वितरित केल्या जातात. जामसंडे हायस्कूलमधील चार लाभार्थी विद्यार्थिनींना अशा सायकलचे वाटप झाले. यामध्ये मंजिरी ठुकरूल, दुर्वा चव्हाण, खुशी चिंदरकर, कोमल निसाद या विद्यार्थिनींचा समावेश होता. या उपक्रमाबद्दल संस्था, शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात! सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू

IND vs ENG 4th Test: बेन स्टोक्सचे खणखणीत शतक! भारतीय गोलंदाज प्रयत्न करून दमले, इंग्लंडसाठी नवा इतिहास रचला

Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण, मुंबईकरांचे हाल; पालिकेचे दावे फोल

Shukra Bhraman 2025 : मिथुन राशीतील शुक्राचं भ्रमण या राशींना देणार भरपूर लाभ; राशीनुसार जाणून घ्या परिणाम

Manikrao Kokate : 'रमी' वाद भोवला: धुळ्यात कृषिमंत्री कोकाटे यांना काळे झेंडे व पत्त्यांच्या माळा दाखवून निषेध

SCROLL FOR NEXT