कोकण

कौशल्यपूर्ण शिक्षणातून आत्मनिर्भर व्हा

CD

79595

कौशल्यपूर्ण शिक्षणातून आत्मनिर्भर व्हा
मिलिंद डांगेः सावंतवाडीत ‘प्लंबिंग टेक्नॉलॉजी’ प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ः आजच्या जागतिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याची नितांत गरज आहे. विशेषतः कोकणातील तरुणांनी कोकणातच राहून रोजगार निर्मिती करावी. नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे, असा मोलाचा सल्ला प्रमुख अतिथी ज्ञानदा गुरुकुल पुणे संस्थेचे संचालक मिलिंद डांगे यांनी दिला. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी आणि ज्ञानदा गुरुकुल संस्था यांच्यावतीने आयोजित ‘प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षण’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी सागर कोकरे या तरुणाने ज्ञानदा गुरुकुल, पुणे येथे प्रशिक्षण घेऊन आपण कसे आत्मनिर्भर झालो, याचे कथन केले. सावंतवाडी आणि परिसरातील युवकांना ‘प्लंबिंग कौशल्य वृद्धी प्रशिक्षण’ घेता यावे, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणामध्ये एक महिन्याचे प्रशिक्षण येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये होणार आहे. पुढील एक महिन्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण ज्ञानदा गुरुकुल संस्था, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती श्री. डांगे यांनी दिली.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे श्री. डांगे यांच्या हस्ते तसेच संस्थाध्यक्ष शैलेश पई, सोमनाथ कुलकर्णी, अमित नाईक यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शाळेच्या संचालिका नम्रता नेवगी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, संचालक श्री. स्वार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी प्रफुल्ल सांगोडकर, प्रा. दिलीप गोडकर, नंदकुमार गावडे, मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे, शिक्षक, प्रशिक्षणाचे संपर्कप्रमुख डी. जी. वरक, उच्च माध्यमिकचे उत्तम पाटील, प्रसाद कोलगावकर, नवीन प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे पालक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. पई यांनी केले. सूत्रसंचालन श्री. वरक यांनी केले. प्रशिक्षणात नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी डी. जी. वरक यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT