कोकण

-मुंबई-गोवा महामार्गावरून वाहतूक धोकादायक

CD

-rat२४p१.jpg-
P२५N७९५६३
संगमेश्वर ः संगमेश्वरजवळील महामार्गावर झालेल्या चिखलातून मार्गक्रमण करताना मोटार.
--------------
महामार्गावर चिखल अन् खड्डेच
वाहतूक धोकादायक ; माभळे, संगमेश्वरमध्ये चालणेही कठीण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर तालुक्यातील काम अत्यंत संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरवली ते उक्षीपर्यंतच्या पट्ट्यात चिखल, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे वाहनचालकही हैराण झाले आहेत. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
महामार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. आजही रस्ता अपूर्ण, धोकादायक आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहे. खासकरून आरवली ते वांद्री, शास्त्रीपूल ते माभळे, ओझरखोल परिसर, एसटी स्टँडजवळील मार्ग या ठिकाणी रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय असून, पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे पादचाऱ्यांना चालणेदेखील कठीण झाले आहे. यामुळे अनेक अपघात घडले असून, काहींना जीवदेखील गमवावा लागला आहे. या महामार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव, वाहतूककोंडी यावर प्रशासनाने अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सव तोंडावर आहे. याकाळात चाकरमानी मोठ्या प्रमाणावर या मार्गावरून ये-जा करत असतात. या महामार्गाची दुरवस्था लक्षात घेऊन तत्काळ रस्ता किमान वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याबाबत प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे आहे, अशी नागरिकातून अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट ः
वाहन दुरुस्तीची अडचण
मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर तालुक्यातील काम अत्यंत संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे. या मार्गावर चिखल आणि खड्डे आहेत. या मार्गावरून प्रवास करताना वाहनात बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करणे म्हणजे दिव्य काम झाले आहे. याचाही विचार प्रशासनाने करावा अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
चौकट
आंदोलनाचा इशारा
दरम्यान, या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा निषेध करत राहुल गुरव यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. महामार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत करावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: पणन विभागाचीच माझ्याकडे अर्धी गर्दी - कृषिमंत्री भरणे मामा

SCROLL FOR NEXT