कोकण

रोहयोतून २०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड

CD

‘रोहयो’तून २०० हेक्टरवर फळबाग
चिपळूण तालुक्यात नियोजन; भातशेतीत घट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : तालुक्यात फळबाग उत्पादनावर भर दिला जात आहे. रोहयोच्या माध्यमातून यंदा २०० हेक्टर क्षेत्रावर विविध फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसोबतच पडीक शेती लागवडीखाली येणार असून, वेगवेगळे प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
काही वर्षांपासून तालुक्यातील भातशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता, महागाईमुळे अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. यामुळेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी साहाय्यकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या विविध फळबाग लागवडीची माहिती दिली जात आहे. शासनाकडून फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते, ज्यामध्ये पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे ३० व २० टक्‍के अनुदान दिले जाते. योजनेत अल्पभूधारक आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

कोट
रोहयोच्या माध्यमातून यंदा २०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यासाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आमचे कृषिसेवक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या योजनेची माहिती देत आहेत. शेती सोडणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भविष्यात आर्थिक संकट येऊ नये म्हणून त्यांना फळबाग लागवडीकडे वळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT