कोकण

-गट व गण संख्या जैसे थे, पण नावे बदलली

CD

गट, गणसंख्या जैसे थे; नावे बदलली
खेड तालुक्यातील चित्र ; राजकीय परिणामाबाबत अजूनही अस्थिरताच
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणांची नावे बदलण्यात आली असून, जिल्हा परिषद गट ७ तसेच पंचायत समिती गणांची संख्या १४ झाली आहे. हे बदल करताना जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये मतदार संख्या वाढल्यामुळे त्या गणांची व गटांची नावे बदलण्यात आली आहेत; मात्र मतदार संख्येमध्ये बदल झालेला नाही. त्याचा राजकीय परिस्थितीवर तेवढासा परिणाम होईलच असे नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यानुसार जुन्या रचनेत खेड तालुक्यात भरणे, अस्तान, फुरूस, सुसेरी, धामणदेवी, लोटे, भोस्ते हे जिल्हा परिषद गट होते तर भरणे, शिरवली, भोस्ते, गुणदे, अस्तान, तळे, फुरूस, चिंचघर, सुसेरी, पन्हाळजे, धामणदेवी, शिवबुद्रुक, लोटे, धामणंद असे पंचायत समिती गण होते. नव्या बदललेल्या मतदार संख्येनुसार, सुकिवली, भरणे, भडगाव, दयाळ, विराचीवाडी, लोटे, धामणदेवी असे जिल्हा परिषद गट तयार केले आहेत तर पंचायत समिती गणांची नावे सुकिवली, तिसंगी, खवटी, भरणे, भडगाव, जामगे, दयाळ, बहिरवली, गुणदे, विराचीवाडी, लोटे, आंबडस, आंजणी, धामणदेवी अशी आहेत. मागील निवडणुकीत जिल्हा परिषद गटातून सदस्य म्हणून अरुण गंगाराम कदम, सिद्धी सचिन पवार, सुनील बाबाराम मोरे, राजेंद्र दत्ताराम आंब्रे, अरविंद लक्ष्मण चव्हाण, नफिसा हशमत परकार, स्वप्नाली रोहन पाटणे तर पंचायत समिती गणातून अनुक्रमे अपर्णा अनिल नक्षे, संजय काशिनाथ आंब्रे, विजय श्रीपत कदम, जीवन गोविंद आंब्रे, राजेंद्र दगडू कदम, तुकाराम लक्ष्मण डफळे, भाग्यश्री भालचंद्र बेलोसे, पूजा अजित भोसले, कृष्णा बंडू लांबे, स्वानंदी श्रीधर गवळी, गणेश तुळशीराम मोरे, मानसी महेश जगदाळे, अनिता अनिल खेराडे, समीक्षा संदेश जाधव हे निवडून आले होते.
या सदस्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून शिवसेनेचे ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य होते. पंचायत समिती गणाकरिता शिवसेनेचे ८ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५ सदस्य निवडून आले होते. एक सदस्य मानसी महेश जगदाळे या अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांना सभापतिपदासाठी संधी दिली होती. शिवसेनेकडून या कार्यकाळात अपर्णा नक्षे आणि विजय कदम यांना देखील सभापतिपदी संधी देण्यात आली होती.

जिल्हा परिषद सात गट
खेड तालुक्यात जिल्हा परिषद गट ७ तसेच पंचायत समिती गणांची संख्या १४ झाली आहे. हे बदल करताना जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये मतदार संख्या वाढल्यामुळे त्या गणांची व गटांची नावे बदलण्यात आली आहेत; मात्र मतदार संख्येमध्ये बदल झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT