७९९५६
सुरणाचे वडे, शेवग्याची भेळ, तोंडलीच्या समोस्याने तोंडाला पाणी
शेठ म. ग. हायस्कूलमध्ये रानभाजी पाककला, विक्री प्रदर्शनाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये रानभाज्या व रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्य पदार्थ तसेच गावठी घरगुती खाद्य पदार्थांचे प्रदर्शन, विक्री तसेच पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला विद्यार्थी, पालकांकडून प्रतिसाद लाभला.
प्रदर्शनाचे उद्घाटन अॅड. अविनाश माणगावकर यांच्या हस्ते झाले. परीक्षक म्हणून दिग्विजय कोळंबकर, मुख्याध्यापक प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर आदी उपस्थित होते. सातवी ते नववीमधील एकूण ८ विद्यार्थ्यांनी रानभाज्या आणि या रानभाज्यांपासून खाद्यपदार्थ बनवून प्रदर्शनात सहभाग घेतला होता. रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्यपदार्थांचे २४ स्टॉल होते. यामध्ये सुरणाचे वडे, शेवग्याची भेळ, तोंडलीचे समोसे, केळफुलांची भजी, भरलेली कटली, अळूचे पॅटीज, अळूचे लॉलीपॉप, ओव्याची भजी, अळूवडी, कुर्डूचे पराठे, टाकळा वडी, सुरणाची फ्रँकी असे विविध रानभाज्यांपासून पदार्थ तयार करण्यात आले होते. गावठी बाजारात उकडीचे तांदुळ, खारावलेले आंबे, गावठी हळद, आवळे, कोकम, आगळ, तांदळाचे लाडू, बिटाचे लाडू असे विविध पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते. या निमित्ताने पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेचे परीक्षण दिग्विजय कोळंबकर यांनी केले. यावेळी स्थानीय समितीचे सदस्य विलास रुमडे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. या उपक्रमास पालकांनी सहकार्य करून प्रोत्साहन दिले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील आफ्रीन पठाण, शामू जंगले, ज्ञानेश्वर कुंभरे, पूजा गोसावी, राजेंद्र कोयंडे या शिक्षकांनी मेहनत घेतली. मुख्याध्यापक प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर यांचे प्रोत्साहन मिळाले.
.................
स्पर्धा निकाल असा
या रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्यपदार्थ स्पर्धेमध्ये अनुक्रम, सानवी विनोद मालवणकर व मुस्कान इरफान शेख (सुरणाची कापे), अध्याय आदित्य शिंदे (केळफुलाची भजी), शिवानी अरविंद गुरव (टाकळा वडी) पहिले तीन आले. तर रानभाज्या व गावठी पदार्थ विक्री स्पर्धेमध्ये अनुक्रमे, हार्दिक रामभाऊ तेली व हर्ष संतोष तेली, दुर्वा मधुकर पराडकर, पूर्वी रवींद्र कोयंडे व ऋतिका शैलेंद्र कणेरकर पहिले तीन आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.