कोकण

रत्नागिरी-विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम वेगाने सुरू

CD

rat25p34.jpg
79923
रत्नागिरीः विमानतळावरील महत्त्वाच्या टर्मिलन बिल्डिंगचे काम वेगाने सुरू झाले आहे.
---------------
विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम वेगाने सुरू
सामंत बंधूंचा पाठपुरावा ; एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : अनेक वर्षे रखडलेल्या येथील विमानळाच्या विकासकामांना वेग मिळला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या माध्यमातून विमानतळाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. रत्नागिरीची टर्मिनल इमारतीचे काम ३५ टक्के पूर्ण असून एप्रिल २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतून प्रवासी हवाई वाहतूक सुरू व्हावी यासाठी मागील काही वर्षापासून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. काही महिन्यांपासून येथील विकासकामांनी वेग घेतला आहे. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी याकडे विशेष लक्ष दिले आहे. या भागाला भेट देत अधिकारी व ठेकेदारांशी वारंवार चर्चा करत टर्मिनल बिल्डिंगचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नुकतीच आमदार किरण सामंत यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी प्रांताधिकारी जीवन देसाई व अन्य अधिकारी उपस्थित होते.
विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम जवळपास ३५ टक्के पूर्ण झाले आहे. एमआयडीसीने हे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. शहरातून विमानतळापर्यंत केबल टाकण्याचे काम सध्या थांबवण्यात आले आहे. याबाबत बांधकाम विभाग आणि प्रांताधिकारी यांच्यात चर्चा होऊन लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल. विमानतळावरील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी रस्त्याशेजारून टॅक्सी ट्रॅकच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

चौकट...
७.२२ हेक्टर जमीन कोस्टगार्डला लवकरच हस्तांतरित
विमानतळासाठी डीव्हीओआर ही नेव्हिगेशन यंत्रणा बसवण्यासाठी ७.२२ हेक्टर जमीन कोस्टगार्डला लवकरात लवकर हस्तांतरित करण्याबाबत प्रांताधिकार्‍यांना सूचना करण्यात आली. त्या व्यतिरिक्त आणखी ७ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कमी दृश्यमानता असताना पायलटला सुरक्षित विमानात उतरवता येण्यासाठी आवश्यक असणारे इन्स्ट्रुमेंट लॅण्डिंग सिस्टिम बसवण्यासाठी आणि विमानतळाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करता येतील. यासाठी आणखी पाच ते सात हेक्टर जागा संपादित करण्यावरही चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT