कोकण

वीज पुरवठा सुरळीत

CD

rat२६p१.jpg-
२५N८००४८
रत्नागिरी-कर्जी खरडपट्ट्यातील जंगलमय भागात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अथक प्रयत्न करून पिन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर यांमध्ये झालेला बिघाड शोधला.
-----
कर्जी खाडीपट्टयातील वीजपुरवठा सुरळीत
महावितरणच्या ४८ अधिकाऱ्यांच्या ३६ तास परिश्रमाला यश ; नागरिकांतून समाधान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : महावितरणच्या खेड विभागातील लोटे उपविभागांतर्गत येणाऱ्या कर्जी खाडीपट्टा या ठिकाणी वीजवाहिन्यांवरील असलेले ‘पिन व डिस्क इन्सुलेटर’ यांमध्ये मोठा बिघाड झाला होता. यामुळे खाडीपट्ट्यातील नांदगाव, सिरसी, मुमके, कोरेगाव, बहिरोली, पन्हाळजे आदी गावे व वाडीवस्ती यांचा वीजपुरवठा खंडित होता; मात्र अतिशय जंगलमय भाग व सततचा कोसळणारा मुसळधार पाऊस अशा आव्हानात्मक परिस्थितीतही महावितरणच्या ८ अधिकाऱ्यांनी व ४० कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत ३६ तासांमध्ये या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला.
सोमवार २१ जुलै सकाळच्या सुमारास सुमारे १९ गावे व वाड्यावस्त्या यांचा वीजपुरवठा वादळवारे व पाऊस यामुळे प्रभावित झाला. यामुळे सुमारे ८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. कर्जी खाडीपट्टा हा जगबुडी नदीकिनारी वसलेला सखल भाग आहे. या भागात घनदाट जंगल व जगबुडी नदीच्या प्रवाहाबरोबर असणारे सखल भाग व सततचा पाऊस यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यास अनेक अडचणी येत होत्या; मात्र महावितरणच्या लोटे उपविभाग, खेड उपविभाग व विभागीय कार्यालय खेड यांमधील ८ अभियंते व सुमारे ४० जनमित्र व बाह्यस्रोत कर्मचारी यांच्या मदतीने सलग ३६ तास आव्हानात्मक परिस्थितीत अहोरात्र काम केले. त्यामुळे नांदगाव, सिरसी, मुमके, कोरेगाव, बहिरोली, पन्हाळजे आदी खाडीपट्टा गावांमधील ३३ व ११ केव्ही वीजवाहिन्यांवरील खराब झालेले ११ पिन व डिस्क इन्सुलेटर बदलले. त्या ३३ केव्ही वाहिन्यांची लांबी ३९ किलोमीटरपेक्षा जास्त असून, ११ केव्ही वाहिन्यांची लांबी ६० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. सर्वांनी सांघिक कामगिरी करून ही अवघड मोहीम यशस्वी करत ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवार २३ जुलैला सायंकाळी ४ वाजता पूर्ववत केला.
रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता सुनील कुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर, उपकार्यकारी अभियंते सचिन वेलणकर, दीपक सपकाळ, नीलेश नानोटे, साहाय्यक अभियंते समीर कदम, सिद्धार्थ पेटकर, रवी निकनवरे व कनिष्ठ अभियंता रोहन बडगुजर या सर्वांच्या टीमने ४० जनमित्र व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली.

चौकट
११ पिन व डिस्क इन्सुलेटर बदलले
नांदगाव, सिरसी, मुमके, कोरेगाव, बहिरोली, पन्हाळजे आदी खाडीपट्टा गावांमधील ३३ व ११ केव्ही वीजवाहिन्यांवरील खराब झालेले ११ पिन व डिस्क इन्सुलेटर बदलले. त्या ३३ केव्ही वाहिन्यांची लांबी ३९ किलोमीटरपेक्षा जास्त असून, ११ केव्ही वाहिन्यांची लांबी ६० किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nice Dp! पत्नीला मित्राचा मेसेज आला अन् पतीने गळा आवळून जीवघेणा हल्ला केला; धक्कादायक घटना समोर...

Solapur Accident: देवदर्शन अन् काळाचा घाला ! 'बल्करच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार'; अक्कलकोट रोडवरील घटना..

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल, हिंगणा पोलिसांची कारवाई

Bribery Action:'बिल काढण्यासाठी लाच मागणारा विस्ताराधिकारी जाळ्यात'; साेलापुरात खळबळ, दोन हजार घेताना सापडला..

Sasapde Murder Case: धक्कादायक! 'सासपडे येथील नराधमाकडून आणखी एका खुनाची कबुली'; सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

SCROLL FOR NEXT