१६ (जाहिरातीसाठी लेख)
(टिप ः योगिता दंत महाविद्यालय अशी जाहिरात असलेल्या पानावर हा लेख वापरणे.)
फोटो ओळी
rat२६p८.jpg-
P२५N८००७५
मुंबई येथील पालखी निवासस्थानी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचा सन्मान केला. सोबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मान्यवर.
rat२६p१२.jpg-
२५N८००७४
सर्व पक्षांतील मान्यवरांशी शिवसेना नेते रामदास कदम यांचे जुने नाते.
rat२६p९.jpg-
P२५N८००७६
एका कार्यक्रमप्रसंगी शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम व शिवसेना सचिव सिद्धेश कदम.
rat२६p१०.jpg, rat२६p११.jpg -
२५N८००७२
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करताना रामदास कदम व अन्य मान्यवर.
..........
शिवसेना नेते रामदास कदम वाढदिवस विशेष ....................डोके
मुंबईतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे रामदासभाई कदम यांनी संपूर्ण खेड तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यात आपल्या कामाची चुणूक दाखवणाऱ्या रामदासभाई कदम यांनी खेड, दापोली, मंडणगड या मतदारसंघात विकासकामाची गंगा आणली आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचा आधार म्हणून ओळखले जाणारे कोकणचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांचा आज वाढदिवस. गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमीच समरस होणाऱ्या आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत धडपडत राहणारे आमचे भाई म्हणजेच आमचं सर्वस्व त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देताना भाईंच्या कर्तृत्वाचा घेतलेला आढावा.
rat२६p६.jpg -
P२५N८००५९
- रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण, दस्तुरी, खेड
----
राज्यभरात कामाचा ठसा उमटवणारे भाई
कोकण आणि रामदासभाई, असे एक समीकरणच बनले आहे. खेड तालुका म्हटले की, सर्वप्रथम नाव येते ते रामदासभाई कदम यांचे. प्रशासनावर योग्य ती पकड ठेवून काम करण्याची लकब त्यांना आत्मसात असल्याने कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्यांची अंमलबजावणी तातडीने होते. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत असल्याने आजवर त्यांनी आपला मित्रपरिवारही वाढवला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आणि हृदयस्पर्शी आणि कोकणच्या लाल मातीतील एक फायरब्रॅड वक्ता म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित झालेल्या रामदासभाई यांनी तारुण्याच्या उंबरठ्यावर शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. एक सच्चा शिवसैनिक म्हणून सर्वसामान्यांच्या न्यायाला वाचा फोडण्यासाठी सेनेचा भगवा हाती घेतला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत असताना सर्वसामान्य गोरगरिबांबद्दल थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हृदयात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी वेगळं स्थान निर्माण केले. त्यांनी कांदिवली पूर्व, हनुमान नगर येथील सेनेच्या शाखाप्रमुख पदाची सूत्रे हाती घेत राजकारणात पदार्पण केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या भाईंनी १९९० मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत विजयाची पताका फडकवली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विजयाची माळ यांच्या गळ्यात पडत होती. तेव्हापासून त्यांनी केव्हाच मागे वळून पाहिले नाही.
शाखाप्रमुख झाल्यापासून ते मंत्रिपदापर्यंतची यशस्वी वाटचाल त्यांच्यातील खऱ्या शिवसैनिकाची साक्ष पटवून देते. तालुक्याचा भाईंनी केलेला सर्वांगीण विकास विधानसभेत विविध विषयांवर झाडलेल्या शब्दांच्या फैरी, त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला तर भाईंचा हात कोणी धरू शकत नाही. भाईंनी राजकीय क्षेत्रात केलेली कामगिरी व शैक्षणिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात घेतलेली गरूडझेप वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या सर्वच क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना आदराचे स्थान आहे. कोकणासह राज्यातील जनतेच्या मनात भाईंनी जे अढळ स्थान मिळवले आहे, त्याला मात्र तोड नाही. शिवसैनिक हे आपले कुटुंब व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच दैवत मानणारे भाई सगळ्यांचा तितकाच आदर करतात.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आयोजित केलेले सामुदायिक विवाहसोहळे त्यांच्या कामाची ठळक आठवण करून देतात.
सेनेच्या माध्यमातून केलेली विकासकामे अतुलनीय आणि कौतुकास्पद म्हणावी लागेल. त्यांच्याकडे एखादी काम घेऊन गेलेली व्यक्ती कोणत्याही पक्षाची असली तरी त्यांचे अडकलेले कोणतेही विकासकाम करणे हा भाईंचा अट्टाहासच. प्रत्येकाचे काम वेगळे, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा; पण कितीही गुंता असला तरी त्यातून भाई मार्ग काढतातच. मग चिंतेत चेहऱ्याने आलेला माणूस एक वेगळं समाधान घेऊनच निघतो. सतत कार्यरत राहणे, हा भाईंचा ध्यासच.
भाई सर्वसामान्यांना आधार वाटतात. भाईंचा धाडसीपणा, निर्णय घेण्याची क्षमता, गोरगरिबांसाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि जामगेची ग्रामदैवता श्री कोटेश्वरी देवीचे वास्तव्याने पावन झालेल्या जामगे गावच्या भाईंनी राजकीय पटलावर उत्तुंग झेप घेतली. जिद्द, चिकाटी, संयम अशा त्रिभुज गुणांच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात उच्च स्तरावर पोहोचलेले आपले भाई, आपल्या मातीला न विसरणारे रामदासभाई हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल. स्वकर्तृत्वावर एवढी उंची गाठूनही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाई नेहमी आपलेसे वाटतात.
भाईंच्या हातून कोकणातीलच नव्हे तर राज्यातील जनतेच्या गोरगरीब रयतेच्या दुष्काळग्रस्त शोषितांच्या समस्यांचे निराकरण व्हावे. राजकारणात येणाऱ्या नवीन युवकांना नवसंजीवनी मिळत आहे; मात्र राजकारण हे सतत परिवर्तनशील असते. या न्यायानेच चार वर्षांपूर्वी राजकीय चक्रे फिरली. आमच्या भाईंनी शिंदेसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
आज ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक खंदे नेते म्हणून भूमिका बजावत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस म्हणून आज भाईंकडे पाहिले जाते. हिंदुत्वाची विचारधारा घेऊन भाईंनी नवी वाट चोखाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांशी सुसंगत होऊन त्यांनी युतीची गाठ बांधली. तेथूनच खेडमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा सुरू झाली. भाईंचे पुत्र आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीदेखील भाईंच्या पावलावर पाऊल ठेवत न बोलता विकासकामे कशी करायची, यात चुणूक दाखवली आहे. खेड-दापोली व मंडणगडचे आमदार म्हणून व राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून युवकांच्या मनातील सक्षम नेतृत्व, असे योगेशदादा ठरले आहेत. शिवसेना नेते आणि कोकणचे भाग्यविधाते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेखनप्रपंच व दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.....
--
चौकट
भाईंची लखलखीत प्रतिमा
रामदासभाईंनी गरिबी म्हणजे काय, गरिबीचे चटके काय असतात, हे जवळून अनुभवले आहे. दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव असलेल्या भाईंना जनमानसात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास वेळ लागला नाही. यामुळेच आदर्श शिवसैनिक उत्तम लोकप्रतिनिधी कसा होऊ शकतो, हे भाईंनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. केवळ कोकणातच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात भाईंची प्रतिमा लखलखीत आहे. आबालवृद्धांच्या ओठावर असलेल्या भाईंनी मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.