कोकण

नीरज इनामदारची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

CD

- rat२६p२७.jpg -
२५N८०१०३
सावर्डे : नीरजचे कौतुक करताना प्राचार्य राजेंद्र वारे व मार्गदर्शक शिक्षक.

नीरजची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
बुद्धिबळ शालेय स्पर्धा; ६ पैकी ५ डावात विजय
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २६ : क्रीडा व युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या चिपळूण तालुकास्तरीय बुद्धिबळ शालेय स्पर्धेत सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडू नीरज इनामदार याने ६ पैकी ५ डाव जिंकले. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात तालुक्यातील २५ शाळांमधील ९२ खेळाडू सहभागी झाले होते. विद्यालयातील प्रणव नायक, जनक पाटणकर, चैतन्य शेंबेकर, अंश पाणींद्रे, आयुष्य पवार, वेदांत शिर्के, सोहम गोसावी, साई जाधव, गंधर्व धने हे दहा खेळाडू सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली. सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक रोहित गमरे, अमृत कडगावे, योगेश नाचणकर, प्रशांत सकपाळ, दादासाहेब पांढरे यांचे मार्गदर्शन लागले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु?

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या अर्जुन सुभेदार खऱ्या आयुष्यातील बायकोचा सतत खातो ओरडा, म्हणाते..'किती वाकडं तोंड...'

Video : फूडचं पाऊल ! मराठी अभिनेत्रीची हॉटेल क्षेत्रात एंट्री ; सुबोध भावेच्या हस्ते पार पडलं उद्घाटन

Baramati Accident : बारामतीत भीषण अपघात, हायवाच्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

Jalna Crime : मंठा तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून अमानुष खून

SCROLL FOR NEXT