कोकण

चराठा-तळखांबवाडी येथे झाड कोसळून घरांची हानी

CD

80121

चराठा-तळखांबवाडी येथे
झाड कोसळून घरांची हानी

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २६ ः चराठा-तळखांबवाडी येथे शुक्रवारी (ता.२५) रात्री झालेल्या वादळी पावसात सागाचे महाकाय झाड दोन घरांवर कोसळले. यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेवेळी दोन्ही घरातील मंडळी सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चराठा-तळखांबवाडी येथे गजानन नारायण बांदेकर आणि दत्तप्रसाद नारायण बांदेकर यांची एकमेकाला लागूनच घरे आहेत. काल झालेल्या वादळी पावसात घरालगतच्या २५ फुटावरील महाकाय उंच सागाचे झाड या दोन्ही घरांवर कोसळल्याने गजानन बांदेकर यांच्या किचन रूमसह पडवीचे वासे, रिप, कौलांसह छप्पर निकामी झाले. तर दत्तप्रसाद बांदेकर यांच्या किचन रूम सह संडासचे वासे, रिप, कौलांसह छप्पर निकामी झाले. यात दोघाचेही सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, सुरेश रामचंद्र परब यांचा माड अर्ध्यावरून तुटून चराठा- ओटवणे या मुख्य रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. गावात इतर ठिकाणीही झाडांच्या फांद्या कोसळल्या. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी तलाठी सुप्रिया घोडके यांनी पाहणी करत पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT