कोकण

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मालवणात कामबंद

CD

80141
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे
मालवणात ‘कामबंद’

थकीत वेतन देण्याची पालिकेकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक बनलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे. जीवाची पर्वा न करता शहरात कचरा उचल करण्याचे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. त्यामुळे थकीत वेतन मिळवून देऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कामगारांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील कचरा उचल व व्यवस्थापन करण्यासाठी मालवण पालिकेकडून डिसेंबर २०१९ मध्ये स्वच्छता विभागासाठी दोन ठेके प्रसिद्ध केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ठेकेदारांनी मालवण पालिकेला कचऱ्याचा उठाव करण्यासाठी कामगार पुरवणे तसेच चालक पुरविणे असे ठेके घेतले. एकूण १७ स्वच्छता कंत्राटी कामगारांचा दोन महिन्यांचा पगार दिलेला नाही. तर यातील एकाचा फेब्रुवारी महिन्याचा व एकाचा मार्च महिन्याचादेखील पगार काही कारणास्तव ठेकेदाराने दिलेला नाही. जीवाची पर्वा न करता प्रामाणिक सेवा देऊनही वारंवार पगार थकीत ठेवला जात असल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे सांगत कंत्राटी कामगार व चालकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT